Home Breaking News आमदार आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले

आमदार आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले

द रिपब्लिक अपडेट ब्युरो

खामगाव:- महाराष्ट्र दिनानिमित्त आ. अँड. आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते आज 1 मे रोजी शासकीय ध्वजारोहण पार पडले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिनाचा सोहळा येथील प्रशकीय इमारत प्रांगणात पार पडला. या निमित्त खामगाव मतदार संघाचे आ. अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव, तहसीलदार अतुल पटोले, नायब तहसीलदार हेमंत पाटील, विजय पाटील, गटविकास अधिकारी चंदनसिह राजपूत, पुरवठा निरीक्षक अधिकारी विशाल भगत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव संजय शिनगारे, माजी प स सभापती सौ उर्मिलाताई गायकी, उमेश ढोण, आशिष सुरेका, यांचेसह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी आ. अँड. आकाशदादा फुंडकर यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.