Home जळगांव जा जलयोद्धा संजय कुटे यांच्या प्रयत्नाला यश 210 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर

जलयोद्धा संजय कुटे यांच्या प्रयत्नाला यश 210 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर

विठ्ठल निंबोळकर : जिल्हा प्रतिनिधी

खामगाव :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन या योजने अंतर्गत अस्तित्वात असलेल्या 140 गाव पाणीपुरवठा योजनेला पूरक अशी 210 कोटी रुपयांच्या जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व गावांकरिता नवीन 140 गाव पाणीपुरवठा योजने ला दिनांक 26 एप्रिल रोजी प्रशासकीय मंजुरात देण्यात आली. या 210 कोटींच्या पाणीपुरवठा योजना मंजुरीचा शासन निर्णय काल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी स्वीकारला. सदर योजने मुळे या दोन तालुक्यातील सर्व नागरिकांना 55 लिटर दरडोई या प्रमाणे पाणी मिळणार आहे. या आधीच्या योजने मध्ये सध्या 40 लिटर दरडोई प्रमाणे पाणी मिळत आहे. त्यामुळे या नवीन योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांकरिता मुबलक पाणी मिळणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पार पडून या कामाला सुरुवात होणार आहे असे आ डॉ संजय कुटे यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांना सुद्धा मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

त्यांच्या करिता दोन विशेष योजना

मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन या प्रकल्पा अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे 140 गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट न करता आलेल्या जळगाव जामोद मतदारसंघातील आदिवासी बांधव वास्तव्यास असलेल्या डोंगराळ गावांकरिता गोराडा व राजुरा धरणावरून शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणेसाठी दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहेत

निमखेडी फाटा अधिक 9 गावे ता जळगाव जामोद प्रादेशिक पाणीपुरवठा योजना.

अशी 13 कोटी रुपये निधीची पाणी पुरवठा योजना असून त्यात खालील गावांचा समावेश आहे. निमखेडी फाटा,जुनापाणी,वडपाणी,गोरक्षनाथ
ईसाई,बांडापिंपळ,निमखेडी,मेंढामारीकहुपट्टा,डुक्करदरी,निमखेडी फाटा

राजुरा अधिक 8 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना

अशी 14 कोटी रुपये निधीची पाणीपुरवठा योजना असून त्यात खालील गावांचा समावेश आहे
नांगरटी,उमापूर,चारबन,गारपेठ,राजुरा,हनवतखेड,रायपूर,शेखगणी,राजुरा फाटा
या दोन योजनेची निविदा प्रक्रिया पार पडली असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे.