Home खामगाव विशेष किराणा दुकानातून वाईन विक्रीस भाजपा महिला मोर्चाचा तिव्र विरोध!

किराणा दुकानातून वाईन विक्रीस भाजपा महिला मोर्चाचा तिव्र विरोध!

खामगाव: भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकनकर यांना निवदेन देण्यात आले. राज्य़ सरकारने वाईन म्हणजेच दारु किराणा दुकानातून विक्रीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी व युवा पिढीस बरबाद करणारा आहे.
राज्य सरकारने वाईन म्हणजे दारू आता राज्यभरातील किराणा दुकानांमध्ये उपलब्ध़ करण्याचा अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला असून याचा सर्व राज्यातून भाजपा महिला मोर्चाव्दारे तिव्र विरोध होत आहे. याबाबत खामगांव भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्य़ महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन नायब तहसिलदार नेमाने यांनी स्व‍िकारले असून या निवेदनाच्या प्रति पोस्टाव्दारे पाठविण्यात आल्या आहे.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज व संतांच्या पवित्र भूमीचा इतिहास व परंपरा लाभलेली असून या महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनवू नका. या निर्णयासंबंधी आमच्या भावना तीव्र आहेत. या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही महिला मोर्चाच्यावतीने निर्णयाचा तीव्र शब्दांत धिक्कार करतो व निषेध व्यक्त करतो. महात्मा गांधीचे नाव घेऊन सत्तेत येणारे आज संपुर्ण राज्यात किराणा दुकानातून “वाईन” म्हणजेच “दारु” उपलब्ध़ करुन देणार आहेत.
राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात काही दिवसांपूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री होणार आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचा महसूल, वाईन उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे दिसते. मात्र यामुळे लहान मुले आणि तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांना त्रास होऊ शकतो. याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही त्याची खंत वाटते.
युवाशक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारु नाही, असा दुर्दैवी युक्तिवाद सरकार करते ते आश्च़र्यचकीत करणारे आहे. सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रांतून विरोध होत आहे.
हा निर्णय मागे घेण्यासाठी राज्य़ सरकारवर राज्य़ महिला आयोगाने दबाव टाकावा व महिलांचे आयुष्य़ देशो धडीला नेणाऱ्या या निर्णयाला एक महिला म्हणून विरोध करावा व हा निर्णय रदद करण्यात यावा असे आवाहन भाजपा महिला आघाडी खामगांव शहर व ग्रामीण मंडलाव्दारे करण्यात आले आहे.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या अनिता देशपांडे, रेखा गणेश जाधव अध्यक्षा, भाजपा शहर महिला मोर्चा, उर्मिला शरदचंद्र गायकी अध्यक्षा भाजपा खामगांव ग्रामीण मंडळ, माजी नगराध्यक्षा अनिता डवरे, जि.प.सदस्या मालुताई मानकर, जान्हवी कुळकर्णी, भक्ती भुषण वाणी, श्रध्दा विश्वास धोरण, पुष्पा शिवाजीराव निबाळकर, रत्ना कैलास डिक्कर, लता श्रीकृष्ण ताठे, सविता निलेश पारधे, वैष्णवी कळसकर, आशा अनंता करांगळे यांची उपस्थिती होती.