Home Breaking News सानंदा यांची फुंडकर यांच्यावर अशीही ‘बोचरी’ टीका ; वाचा नेमकी काय?

सानंदा यांची फुंडकर यांच्यावर अशीही ‘बोचरी’ टीका ; वाचा नेमकी काय?

 

रिपब्लिक डेस्क : वैभव पाटील

खामगाव:- तालुका खरेदी-विक्री ही संस्था अनेक वर्षापासून भाजपच्या अधिपत्याखाली आहे. या संस्थेंमध्ये व्यक्तीगत मतदार संघात आधीच्या सत्ताधारी गटाची 40 टक्क्यापेक्षा जास्त मतदार संख्या आहे, असे असतांना सुध्दा खरेदी विक्री संस्थेंच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडत असतांना स्थानिक आमदार दिवसभर चक्क बुथ प्रमुखांच्या भुमिकेत होते अशी टीका करत हाच महाविकास आघाडीचा विजय आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी म्हटले आहे .
तब्बल अंदाजे 14 वर्षांनंतर खामगाव तालुका खरेदी-विक्री संस्थेची निवडणूक पार पडली. समविचारी घटक पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरे गेली. कोणताही अपप्रचार तसेच कुणाशीही राजकीय वैर न बाळगता निवडणूक लढविली गेली. सोसायटी मतदार संघात घटक पक्षांना जागा सोडण्यात आल्या. ही निवडणुक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर सोसायटी मतदार संघात सहा पैकी सहा जागेंवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती तर व्यक्तीगत मतदार संघात सुध्दा बहुमत मिळेल इतपत उमेदवार विजयी होतील असेही माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी म्हटले आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची असलेली खामगाव तालुका खरेदी-विक्रीचे निवडणुका सुरू असताना खामगाव मतदारसंघातील परंपरागत राजकीय विरोधक पुन्हा एकदा समोर आले असून त्यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला असल्याचे दिसून आले.

गुलाल कुणाचा ?

खामगाव तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. आज 12 फेब्रुवारी शनिवारी मतमोजणी सकाळी 10 वाजता पासून मतमोजणी सुरू होणार आहे. नांदुरा रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे.
सुरवातीला वयक्तिक मतदार संघांची मतमोजणी होणार असून 1610 मतदारांनी या मतदार संघात बजावला हक्क आहे. या मतदारसंघात 8 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. तर सोसायटी मतदार संघात 100 टक्के 59 पैकी 59 मतदाराणी केले 100 टक्के मतदान या मतदार संघात 6 संचालक निवडले जाणार आहेत. प्रथमतः अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो हे दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल.