Home खामगाव विशेष काही तासांतच निकाल ; खरेदी – विक्रीवर कुणाचा झेंडा ? ‘अशी’ होईल...

काही तासांतच निकाल ; खरेदी – विक्रीवर कुणाचा झेंडा ? ‘अशी’ होईल मतमोजणी!

द रिपब्लिक डेस्क

खामगाव : कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा आमने सामने येण्याचा योग तालुका खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकी निमित्ताने आला आहे. सहकार क्षेत्रातील ही संस्था महत्त्वाचे असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत महा विकास आघाडीचे पॅनल व भारतीय जनता पार्टी अशी लढत झाली आहे ही निवडणूक स्थानिक पातळीवर आणि एका छोट्या संस्थेची असली तरी आजी माजी आमदार या निवडणुकीचा प्रचारादरम्यान आपली प्रतिष्ठा पणाला धावताना दिसून आले दरम्यान आता या निवडणुकीचा निकाल लागणार आहे दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने खामगाव सह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष तालुका खरेदी-विक्रीच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

खामगाव तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. आज 12 फेब्रुवारी शनिवारी मतमोजणी सकाळी 10 वाजता पासून मतमोजणी सुरू होणार आहे. नांदुरा रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे.
सुरवातीला वयक्तिक मतदार संघांची मतमोजणी होणार असून 1610 मतदारांनी या मतदार संघात बजावला हक्क आहे. या मतदारसंघात 8 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. तर सोसायटी मतदार संघात 100 टक्के 59 पैकी 59 मतदाराणी केले 100 टक्के मतदान या मतदार संघात 6 संचालक निवडले जाणार आहेत.
खामगाव तालुका खरेदी विक्री ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून बाबुराव शेठ लोखंडकार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे आता या संस्थेवर कुणाचा झेंडा फडकतो. हे काही तासातच स्पष्ट होईल.