Home Breaking News खरेदी विक्रीत ज्वारी खरेदी घोटाळा?प्रशासनाने दिले हे आदेश; मोठे मासे गळला लागणार!

खरेदी विक्रीत ज्वारी खरेदी घोटाळा?प्रशासनाने दिले हे आदेश; मोठे मासे गळला लागणार!

विठ्ठल निंबोळकार
संग्रामपूर : तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्था संस्था यापूर्वी राज्यभर तूर घोटाळ्याने गाजली आहे सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे तर आता व्यापार्‍यांकडून शासकीय हमीभावात ज्वारी खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांच्यावतीने करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जामोद येथील एका व्यापाऱ्याने महाराष्ट्राच्या लगत असलेल्या मध्यप्रदेश येथून निकृष्ट दर्जाची ज्वारी तसेच मागील वर्षीची महाराष्ट्रातील निकृष्ट दर्जाची ज्वारी कवडीमोल भावामध्ये खरेदी करून साठेबाजी केलेली होती . हा साठेबाज सहकार क्षेत्राशी संबधित असून अनेक गोडावून मध्ये साठा ठेवला जातो .वास्तविक पाहता मागील खरीप हंगामामध्ये राज्यामध्ये कुठेही पाहिजे तसे ज्वारीचे उत्पादन झालेले नाही . अनेक व्यापारी बाहेर राज्यातून ज्वारी चा पुरवठा हया परिसरात करीत असतांना सर्रास आढळतात .अशातच सरकारने ज्वारी चा हमीभाव2738 रुपये जाहीर केलेला आहे त्यामुळे जळगाव जामोद येथील सहकार क्षेत्राशी जवळीक ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांने मध्य प्रदेश येथून खरेदी केलेली कवडीमोल भावांमधील निकृष्ट दर्जाची काळी ज्वारी जळगाव जामोद खरेदी-विक्री संघामध्ये विकण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेथील संबंधित संचालक मंडळ यांनी स्थानिक शेतकऱ्यांची ज्वारी हमीभावाने खरेदी करण्यात येत असल्याचे सांगून सदर व्यापारी याला नकार दिला होता त्यामुळे संबंधित व्यापारी याने संग्रामपुर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था येथील खरेदी केंद्रामध्ये जवळपास 500 क्विंटल ज्वारी 27, 28, 29 जानेवारी 20 22 रोजी 2738 सरकारी हमी भावाने शेतकऱ्याच्या नावावरती ज्वारी विक्री केलेली आहे यासोबत सुमारे 50 शेतकऱ्यांचे सातबारे लावण्यात आले . कृषी विभागा कडे ह्या पन्नास शेतकऱ्या चे शेतात ज्वारी धानाचे पिक घेतल्याची नोंद आढळत नाही .तर ख वि सं ने 29 जानेवारी पर्यत 77 शेतकऱ्यांच्या सातबारा वरती 1317.50 क्विंटल ज्वारी चे खरेदी केल्याची माहिती आहे याप्रकरणी सहकार खात्याने सदर निकृष्ट दर्जाची ज्वारी खाण्यालायक आहे की नाही ह्याची चाचणी करण्यात यावी . सदर प्रकरणात ज्वारी विक्री करणारा तो मास्टर माइंड व्यापारी शेतकऱ्याच्या सातबा-यावर ज्वारी विकून सहकार व कृर्षा विभागाची फसवणूक करणाऱ्या संबंधितावर चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा राज्यभर गाजलेल्या तूर घोटाळा प्रमाणेच ज्वारी घोटाळा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही ही कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे . सध्या संग्रामपूर तालुक्यातील सुज्ञ नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चाचे पेव फुटले आहे.

चौकशीचे आदेश

संग्रामपूर तालुक्यात ज्वारी उत्पादन जास्त होत नाही, ज्या ७७ शेतकऱ्यांच्या नावावर ज्वारी खरेदी केली गेली ती संशयास्पद असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पेरेपत्रकानुसार एकरी ४ एकर खरेदी करता येते, त्यामुळे जर चुकीच्या पद्धतीने जर खरेदी झाली असली तर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.