Home Breaking News कोविड उपचार माहिती आता ‘अशी’ मिळवा आपल्या मोबाईल अँपवर!

कोविड उपचार माहिती आता ‘अशी’ मिळवा आपल्या मोबाईल अँपवर!

खामगाव :कोविडचे निदान झाल्यावर उपचार सुविधांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘एमएचसीसीएमएस’ (MHCCMS) अर्थात कोविड केअर) मॅनेजमेंट सिस्टीम या मोबाईल अॅप ची निर्मिती केली असून या मध्यमातुन नागरिकांनी माहिती घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिकआरोग्य विभागाने हे अॅप तयार केले असून www.mahacovid.jeevandayee.gov. in ही  अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक आहे.
या शिवाय गुगल प्ले स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यावर आपण आपला जिल्हा, तालुका आदी निवडल्यावर आपल्या भागातील उपलब्ध बेड संख्या, कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड उपलब्ध आहेत. त्यातही ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सुविधा, अतिदक्षता विभाग, साधे बेड या प्रमाणे वर्गिकरण ऊपलब्ध आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्धता व अशी विविध प्रकारची माहिती यात उपलब्ध करण्यात आली आहे.या शिवाय अन्य जिल्ह्यातील माहितीही नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच त्या त्या रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना ही माहिती पाहता येणार आहे. जेणेकरून त्यांना आपल्या घरातील रुग्णाच्या उपचाराबाबत मार्गदर्शन मिळेल. या शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना युजर आयडी व पासवर्ड द्वारे, औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता याबाबतची माहितीही जिल्हास्तरावरील नियोजनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.  सर्व नागरिकांनी या अॅप चा वापर कोविड उपचार सुविधा माहितीसाठी करावा,असे आवाहन बुलढाणा जिल्हा प्रशासन यांनी केले आहे.