Home जागर मराठा पाटील युवक समितीच्या अविरत,अखंड सेवाकार्याचे एक तप पूर्ण !

मराठा पाटील युवक समितीच्या अविरत,अखंड सेवाकार्याचे एक तप पूर्ण !

मराठा पाटील युवक समिती मागील दहा वर्षापासुन विविध सामाजिक उपक्रम राबवुन समाजातील गरजु व वंचीतांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असते.

संघटना हेची शक्तीचे सुत्र । ग्रामराज्य निर्माण करी ।।
ग्रामगिता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत सांगीतल्याप्रमाणे समाजाची प्रगती करावयाची असेल तर संघटनआवश्यक आहे. युवक हा सामाजाचे भविष्य असतो. त्यामुळे समाजाची प्रगती करण्यासाठी समाजाचा पाया म्हणजेच युवक हा संघटीत तसेच स्वयंपुर्ण होईल तेव्हाच समाज हा प्रगतीशिल होईल. काळाची गरज ओळखुन गजानन ढगे यांच्या नैतृत्वाखाली समाजाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी युवकांना केंद्रस्थानी ठेवुन 10 वर्षापुर्वी मराठा पाटील युवक समितीची स्थापना करण्यात आली.

सुरुवातीला खामगाव व तालुक्यातील ग्रामीण भागात समिती मार्फत विविध सामाजिक उप्रकम राबविण्यास सुरुवात केले. सामाजिक उपक्रमासोबतच गजानन ढगे यांच्या नैतृत्वात सामाजीक कार्यासाठी गावोगावी सभा घेवुन समाजातील युवकांना समिती सोबत जुळण्यासाठी प्रोत्साहित केले.

“अकेलेही चला था ……लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया”
या प्रमाणे काही बोटावर मोजण्या इतकी संख्या असलेल्या युवक समितीचे कार्य व समाजाप्रती असलेली तळमळ जाणुन गजानन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारोच्यावर युवक समितीसोबत जुळुन समाजकार्यासाठी पुढे आले.
समितिचे कार्य आज बुलढाणा जिल्यातील घाटाखालील खामगाव, नांदुरा, मलकापुर, शेगाव, मोताळा, जळगाव तसेच संग्रांमपुर या सर्व तालुक्यात अविरत सुरु असुन समिती वतीने ग्रामीण भागात शाखा स्थापनेतुन युवकांचे संघटन करुन ग्रामिण भागातील समस्या सोडविण्या विशेष भर दिल्या जातो.
याचबरोबर अकोला व ईतर लगतचे जिल्हामधील युवक सुध्दा समितिचे कार्य पाहुन समिती सोबत समाजकार्यासाठी जुळण्यासाठी तयार आहेत. सोशल मिडियावर मराठा पाटील युवक समितिच्या सोबत जवळपास महाराष्ट्रातील पंधरा हजार च्यावर युवक जुळले आहेत.
मराठा पाटील युवक समिती शंभर टक्के फक्त समाजीक कार्यात कार्यरत आहे. समिती मार्फत राबवित असलेल्या सामाजिक उप्रकमामध्ये जात-धर्म याचा कधीच विचार न करता सर्व स्तरातील गरजु व वंचीतांचे सामाजीक प्रश्न सोडविण्यासाठी समितीतिल सर्व कार्यकरते सदैव तत्पर असतात.
गजानन ढगे यांच्या नैत्रुत्वात समितीच्या शाखामार्फत वेळोवेळी विविध सामाजीक उपक्रम राबविले जातात.
समितीची ना नफा ना तोटा या तत्वावर सध्या खामगाव तालुक्यात 3 रुग्णवाहीका २४ तास कार्यरत असुन ईतर तालुक्यातही रुग्णवाहीका प्रस्तावित आहै. समितीवतीने वेळोवेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते तसेच गरजुंना वेळेवर रक्त उपलब्ध करण्यासाठी कार्यकर्ते तत्पर असतात. समितीच्या माध्यमातुन ग्रामिन भागातील विविध शाखेमार्फत हजारो नागरीकांची मोफत नेत्र तपासनी करुन 350 च्या वर रुग्णांची डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. गरजु रुग्णांना समितीवतीने आर्थीक मदत व वैद्यकीय साहीत्याचे जसे कर्णयंत्र, वाॅकर आदि साहित्य वाटप करण्यात आले. याचबरोबर वेळोवेळी गरोदर माता व लहान मुले तसेच अस्थिरोग आदि वैद्यकीय तपासणी शिबिरे समिती च्यावतीने वेळोवळी राबविण्यात येतात. ग्रामीण रुग्णालयात समितीवतीने वेळोवेळी अन्नदान, फळवाटप तसेच स्वच्छ पाणीवाटप करण्यात येते. दरवर्षी समितीवतीने खामगाव , नांदुरा व शेगाव शहरामध्ये गरजुंना शाल व कपड्यांचे वाटप करण्यात येते. समितीवतीने विविध शाखेमार्फत वृक्षारोपन करण्यात येते तसेच गरजेंचेवेळी टँकरने पाणीपुरवठा केला जातो.
विद्यार्थ्यांचे आर्थीक परीस्थितीमुळे शैक्षणीक नुकसान न व्हावे यासाठी दरवर्षी समितीमार्फत शालेय साहीत्याचे वाटप करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेश व शैक्षणीक शुल्क आदिसाठी मदत करण्यात येते.
युवकांनी व्यवसायाकडे वळुन सक्षम व्हावे यासाठी समितीवतीने वेळोवेळी केद्र व राज्य सरकार आदिमार्फत देण्यात यणार्‍या व्यवसायिक योजना विषयी मार्गदर्शन शिबीरे घेण्यात येतात याचबरोबर शिक्षीत व होतकरु युवकांना रोजगार मिळावा यासाठी मार्गदर्शन शिबिरे राबविण्यात येतात.
यासोबतच विविध क्षेत्रात आपले योगदान देऊन समाज उन्नतीसाठी सतत झटणार्‍या समाजातील नागरीकांचा छत्रपती संभाजी महाराज जयंती निमीत्त “छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव” पुरस्कार देण्यात येतो.
तसेच समाजातील युवकांचा संघटनेचा संदेशसाठी दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी दरवर्षी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात येते तसेच वेळोवेळी सभा व ग्रामसभांचे आयोजन करुन समाजबांधवानमध्ये जनजागृती करण्यात येते.
कोरोणा या साथीच्या रोगाच्या काळात समितीवतीने न थांबता गजानन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य अविरत सुरु ठेवले.
कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी समितीवतीने आवश्याक असे मास्क, सॅनीटायझर आदिचे पोलीस स्टेशन, तसेच विवि शाखामार्फत ग्रामीन व शहरी भागात मोफत वाटप करण्यात आले. याचबरबर शेगाव शहर मध्ये फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले.
याचबरोबर कोरोना ग्रस्तांना रक्ताची कमतरता येऊ नये यासाठी शासनाच्या आव्हानाला प्रतीसाद देत असुन शेगाव व खामगाव येथे रक्तदान शिबिर असे उपक्रम राबवले.