Home खामगाव विशेष अक्षय हातेकर यांचे कार्य स्तुत्यच : युवा सेना शहर प्रमुख राहुल कळमकार

अक्षय हातेकर यांचे कार्य स्तुत्यच : युवा सेना शहर प्रमुख राहुल कळमकार

हातेकर आणि त्यांच्या टिमचा  सत्कार 

खामगांव (का. प्र.) :- स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात प्रहार अपंग सहाय्यता केंद्र हे मागील 1 वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू व गजाननभाऊ लोखंडकार यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रहार चे शहर अक्षय हातेकर यांच्या प्रयत्नाने हे केंद्र मागील 1 वर्षापासून कार्यरत असून याचा अनेक दिव्यांग बांधवांना लाभ होत आहे. मात्र या सहाय्यता केंद्राला भरभरून प्रतिसाद मिळत आहे तेव्हा त्याचे श्रेय इतरच घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे , विशेष म्हणजे अक्षय हातेकर हे स्वखर्चातून हे दिव्यांग सहाय्यता केंद्र चालवित असून ते स्वतः लॅपटॉप घेवून येतात, प्रिंटाऊट चे पैसे देखील घेत नाहीत व योग्य मार्गदर्शन सुध्दा करतात.
अक्षय हातेकर आणि त्यांच्या टिम व्दारे करण्यात येणार्‍या या कार्याची दखल घेवून त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून युवा सेना खामगांव शहर प्रमुख राहुल कळमकार यांनी अक्षय हातेकर व त्यांच्या सहकार्‍यांचा सन्मानचिन्ह, शाल , श्रीफळ देवून गौरव सामान्य रूग्णालयात जावून सत्कार केला. यावेळी राहुल कळमकार, बंटी चौकसे,मोनु सलुजा,स्वप्नील दामोदर,अजय खत्री,धिरज कवठाळे, रवि जैन,मनोज परकाळे,लकी पुरोहित, हर्षल पाटिल,सर्मथ देशमुख, आकाश दुधे,पवन देळुंदे,अक्षय दाबाळे,गोलु वानखडे,सौमेश धनलोबे, अभिजित निळे, श्रीकांत कोठाळे,दिपक पाटील, शुभम देळुंदे,यश जांबे, प्रफुल्ल करर्पे,आयुश शर्मा,राजु कराडे,रवि ढगे,आदी उपस्थित होते.