Home Breaking News घरमालक तेरविला गेले एकडे घरीच चोर आले!

घरमालक तेरविला गेले एकडे घरीच चोर आले!

२ आरोपी अटक नवीण भोन येथील घटना

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील नविन भोन येथील नातलगाच्या घरी गावात तेरविच्या कार्यक्रम असल्याने व घरी कोणी नसल्याचे संधी साधुन दोन चोरट्यांनी दरवाजा उघडून घरात आत प्रवेश व लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील १० ग्रम सोन्याची पोत अंदाजे किं ३५ हजार रुपये अर्धा ग्रम सोन्याचा ओम अंदाजे किं १५०० शे रुपये , चांदीच्या तोरड्या किं २००० रुपये , नगदी ७५० रु एकुन ३९२५० रुपयाचा माल लंपास केल्याची घटना तेरवीचा कार्यक्रम आटपुन घरी आल्या नंतर उघडकीस आली
या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील नविन भोन येथील रहिवासी दुर्गा विठ्ठल ठाकरे यांच्या नातलगाच्या घरी तेरवीचा कार्यक्रम असल्याने संधी साधुन गावातीलच दोघे घराचा दरवाजा उघडून घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोन्याची पोत , सोन्याचा ओम , चांदीच्या तोरड्या , नगदी असे एकुन ३९२५० रुपयाचा मुद्देमाल दोघांनी चोरल्याचा संशय असुन या बाबत शेजाऱ्याकडे चौकशी केली असता गावातील दोघे संशयीत घरातुन निघतांना निदर्शनास आले शेजाऱ्यांनी पाहिल्याचे घर मालक विठ्ठल ठाकरे यांना सांगितले दोन संश्यीत चोरट्यानी गावात चोऱ्या केल्याने दोन्ही संश्यीत आरोपी विरुद्ध लेखी तक्रार
दुर्गा विठ्ठल ठाकरे यांनी तामगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यादी वरुन गावातील आरोपी रविन्द्र उर्फ शिवा नारायण ठाकरे व रामेश्वर मनोहर मांजरे दोघे रा नविन भोन यांना तामगाव पोलीसांनी अटक करुन दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ४५४ , ३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तामगाव पोस्टेचे ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार मेहेश्रे करित आहे