Home Breaking News एसटी चालकाची धावत्या कार समोर उडी घेत आत्महत्या

एसटी चालकाची धावत्या कार समोर उडी घेत आत्महत्या

अकोट (जि. अकोला) : शहादा डेपो जिल्हा नंदुरबार येथील एसटी चालक म्हणून नोकरीला असलेले अरविंद अनंत चव्हाण (वय ४०) यांनी अकोट तालुक्यातील देवरी फाट्या नजीक धावत्या कार समोर   उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सदर कर्मचारी हे मागील पाच ते सहा महिन्यांपासून मानसिक आजाराखाली असल्याचे समजते. या कर्मचार्‍याला एसटी खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. मृतक अरविंद चव्हाण यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते दररोज इतरत्र फिरत असत.आज रोजी त्यानी एका धावत्या वाहना समोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अरविंद चव्हाण गंभीर जखमी झाले. ज्या वाहनसमोर अरविंद चव्हाण यांनी उडी घेतली त्याच वाहनातून त्यांना पुढील उपचारासाठी अकोट येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.