Home Breaking News गुटखा माफिया Asp पथकाच्या रडारवर! खामगावच्या निलेश राठी नंतर शेगावात टीबडेवाल बंधूंना...

गुटखा माफिया Asp पथकाच्या रडारवर! खामगावच्या निलेश राठी नंतर शेगावात टीबडेवाल बंधूंना अटक ; लाखोंच्या मुद्देमाल जप्त

शेगाव- कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक श्रवणकुमार दत्त यांनी गुटका माफिया विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून खामगाव येथील बहुचर्चित निलेश राठी यास बुधवारी अटक झाल्यानंतर शेगांव येथे सुद्धा गुरुवारी कारवाई करत अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक श्रवणकुमार दत्त खामगांव यांचे पथक व गुन्हे शोध पथक शेगांव यांनी संयुक्त कारवाई करत शेगाव शहरातील गुटखा विक्री करणारे प्रितम कमलकिशोर टीबडेवाल (वय 36 वर्ष) व सौरभ कमलकिशोर टिबडेवाल (वय 36 वर्ष ) दोन्ही रा. लखपती गल्ली, शेगांव या दोन्ही बंधुवर कार्यवाही केली आहे.
बुधवारी खामगाव गुटका किंग निलेश सुरेश राठी याच्या मुसक्या आवळत जुन्या गुन्हयात निलेश राठी याला अटक केली आहे. डीपी रोड वर अन्न व औषधी विभागाचे अधिकारी यांनी केली होती.काही महिन्यांपूर्वी कारवाई त्यामध्ये 35 लाखाचा गुटखा जप्त केला होता या तपासात आरोपी असलेला अजय खंडारे भीमनगर, शिरसगाव देशमुख याला अटक केली होती. तपासात निलेश सुरेश राठी याचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली काल अटकेनंतर कोर्टात हजर केले असता त्याला 14 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास अप्पर पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली sdpo अमोल कोळी हे तपास करीत आहेत. दरम्यान गुरुवारी शेगाव येथे टीबडेवाल बंधूना अटक करून अवैध गुटका, मोबाईल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अग्रसेन चौकातील प्रीतम  ट्रेडर्स तसेच लखपती गल्ला गल्लीतील घरातून अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पोउपनि पंकज सपकाळे, व पो.स्टॉप पोहेको अशोक सुर्वे, ना.पो. को रघुनाथ जाधव, गजानन आहेर, नेशसिंग इंगळे पोको राम धामोडे, दिपक राठोड, प्रफुल्लन टेकाळे, मका निगुर्णा सानेटक्के, अनिता गायके असे पोलीस स्टेशन रोगाव शहर येथे पोहचुन पोस्टे शेगाव शहर पंथील गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि नितीन इंगोले, पो.कॉ विजय साळवे, तसेच पो.स्टे. शेगांव ग्रामीण येथील पोउपनि निलेश डावेराव यांनी ही कारवाई केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास . श्रवणकुमार दत्त (भा.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक सा. खामगांव व शेगांव शहर पो.स्टे. चे टाणेदार श्री. अनिल गोपाळ यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि.नितीन इंगोले पो.स्टे. शेगांव शहर हे करीत आहे.

खरे गुटखाकिंग गजाआड

बुलढाणा जिल्हा गुटखा विक्रीसाठी प्रसिद्ध असून खामगाव चिखली गुटका तस्करीचे केंद्र बनले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात आतापर्यंत बिनदिक्कत गुटका व्यवसाय सुरू होता मात्र कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक श्रवणकुमार दत्त यांनी आता अवैध गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून खरे आता गुटखाकिंग गजाआड टाकले जात आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here