Home Breaking News पहिली असताना माजी सरपंचाने दुसरीशी जमवले सूत

पहिली असताना माजी सरपंचाने दुसरीशी जमवले सूत

दुसऱ्या पत्नीचा शारिरीक छळ केल्याप्रकरणी गुन्हा 
खामगाव – पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान एवढ्यावरच न थांबता या महाभागाने दुसऱ्या पत्नीपासून मुलगा जन्मल्यानंतर तिचा मानसिक व शारिरीक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्रामीण पोस्टेला देण्यात आली असून पोलिसांनी शेलोडी येथील माजी सरपंच संतोष येवले विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
यासंदर्भात कविता संतोष येवले वय ३५ यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे की, संतोष येवले सोबत त्यांचे जुने प्रेम संबंध होते. मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता त्यामुळे त्यांनी आपल्या जातीच्या व्यक्तीसोबत लग्न केले होते. मात्र कविता यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. त्यानंतर संतोष येवले याने मी तुझा सांभाळ करेल असे म्हणून कवितासोबत लग्न केले. मात्र घरी न नेता साईनगर वाडी येथे भाड्याची खोली करून ठेवले. संतोष येवले पासून कविता यांना एक मुलगा झाला आहे. या मुलाचा जन्म झाल्यापासून संतोष हा कविताशी भांडत होता. दरम्यान कविताने मला शेलोडी येथे घरी घेवून जा असे म्हटले असता संतोषने नकार देत कविता यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच तू शेलोडी येथे घरी आली तर तुझे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी संतोष येवले विरूध्द कलम ४९८, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, भादंवी तसेच सहकलम ३ (आय) (आय) (ड), ३ (२) (व्हीक्यू) अनुसूचित जाती जमाती अपराध प्रतिबंधीत अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला असून संतोष येवले याला अटक करण्यात आली आहे.
—————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here