Home अकोला जिल्हा वृत्त गरिबांना ब्लँकेट देऊन केला वाढदिवस साजरा !

गरिबांना ब्लँकेट देऊन केला वाढदिवस साजरा !

 

आधारपर्व फाऊंडेशन अध्यक्षा श्रद्धा गढे यांचा प्रेरणादायी उपक्रम

अकोला-: आपण या समाजाचे घटक आहोत आणि प्रत्येक माणसानी आपल्या परीने जी मदत करता येईल ती केली पाहिजे या संकल्पनेतुन महाराष्ट्रभर गरीब गरजु,अपंग, निराधार यांच्या मदतीचा वसा हाती घेत सुरु केलेल्या आधारपर्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धाताई गढे यांनी आपल्या वाढदिवस दिनी वायफत खर्च न करीता अकोला शहरातील रेल्वे स्टेशन, बस्थानक परिसरात,रोड लगत राहत असलेल्या गरजूंना थंडीच्या दिवसांत आवश्यक ब्लँकेट देऊन वाढदिवस साजरा करून प्रेरणादायी संदेश दिला.

या सेवाकार्यात फाउंडेशन सदस्य निताताई वायकोळे,दीपक वानखेडे,वर्षाताई पारसकर,भाग्यश्रीताई मोरे,अमोल बावस्कार,सुनीताताई ताथोड,वैशालीताई जाधव, भागवत देशमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले.वाढदिवसाच्या दिवशी केक नसहकार्य फुले,पुष्पगुच्छ घालतात त्याच पैश्याचा आपण सदुपयोग करून गोरगरिबांच्या चेहऱ्यावरच्या यशाच आनंद घेतला तर नक्कीच उपाशी पोटी झोपणारे उपाशी पोटी झोपणार नाही असे श्रद्धा गढे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here