Home खामगाव तालुका लोकशाहीत प्रसार माध्यम आणि पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो डॉ. गुफरान...

लोकशाहीत प्रसार माध्यम आणि पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे सर्वसामान्यांना न्याय मिळतो डॉ. गुफरान उल्ला खान

लाखनवाडा येथे इन्कलाब फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा नागरी सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कार्यक्रम उत्साहात

सहदेव वाकोडे

लाखनवाडा-लोकशाहीच्या काळामध्ये प्रसार माध्यम आणि पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळेच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणारे सर्व पत्रकार बांधव करत असल्यामुळेच जनतेने त्यांच्या भावना समजून घ्याव्यात व विविध क्षेत्रात आपल्या अभ्यासाच्या बळावर यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थाच्या पाठीवर कौतुकाची थाप देवून त्यांचा उत्साह वाढवावा असे प्रतिपादन युनानी तज्ञ इन्कलाब फाउंडेशनचे अध्यक्ष गुफरानउल्ला खान यांनी केले ते लाखनवाडा येथे इन्कलाब फाउंडेशनच्या फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकारांचा नागरी सन्मान तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कार्यक्रमात बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त पत्रकार तथा ज्येष्ठ समाजसेवक संताराम तायडे, लोकमत समाचार खामगाव चे ज्येष्ठ पत्रकार मो.फारुख सर लाखनवाडा तंटामुक्ती अध्यक्ष अजीम खान सरपंच शेख अफरोज नव्याने राज्य लोकसेवा आयोग परीक्षा उतीर्ण झालेली बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक अधिकारी कु.राजश्री चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते ह्या कार्यक्रमात पत्रकार दिना निमित्त कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार संताराम तायडे दैनिक लोकमत चे वार्ताहर लक्ष्मणराव ठोसरे .मुंबई आकाशवाणी बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी मिशन वात्सल्य शासकीय समन्वय समितीचे सदस्य सचिन ठाकरे. दै.लोकमत समाचार चे जेष्ठ पत्रकार मो.फारुख सर,दैनिक देशोन्नती चे वार्ताहर सहदेव वाकोडे, पत्रकार,कैलास नांदोकार, सिद्धेश्वर सरजने, पत्रकार सचिन बहुरूपी, अमोल भोलनकर, अशोक तायडे,माजी.पं.स सदस्य सजाद उला खान ,कुस्तीपटू नवल रामदास पांढरे, आदीं सर्व पत्रकारांचा व मान्यवरांचा नागरी सन्मान यावेळी करण्यात आला तसेच लाखनवाडा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांमध्ये अधिकारी पदावर निवड झालेल्या कु. राजश्री चौधरी,सह परिसरात नव्याने आपल्या विविध क्षेत्रात विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा तसेच लाखनवाडा येथील ग्रामपंचायत सरपंच.उपसरपंच ,सदस्य या सर्वाचा सन्मान सोहळा ह्या वेळी संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन प्रा.अशोक तायडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण चौधरी ,सुमित वाकोडे यांनी केले ह्या कार्यक्रमाकरिता इन्कलाब फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here