Home जागर जनतेच्या मनातील महाराष्ट्र भुषण,सत्यपाल महाराज!

जनतेच्या मनातील महाराष्ट्र भुषण,सत्यपाल महाराज!

उद्या इतिहास लिहल्या जाईल ,तेंव्हा प्रबोधनकार सत्यपाल महाराज अजरामर झालेले दिसतील.उजाड आयुष्य सावरतांना,लाखो संसारात प्रबोधनाची बीजे पेरणारा हा आमचा महाराज संत तुकाराम,गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पठडीतील आहे. चालते बोलते विद्यापीठ!अंधश्रद्धा,व्यसन,जातीवाद,बुवाबाजी,धर्माच्या नावावर चाललेल्या रूढी परंपरेवर वार करणारा ,वारकरी म्हणजे सत्यपाल महाराज!घरात डाळ दाना नाही,खायचे वांधे,,,चिंध्याचे कपडे,,,,घरात शिलाई मशीन होती पण दुसऱ्याचे कपडे शिवण्यासाठी,,,एक आणा,दोन आण्यात काय होणार?बाप विश्वनाथ,,,,माय सुशीला,,,,भाऊ उकर्डा,बहीण वनमाला अन सत्यपाल,,,चहा विकून भजन म्हणणारा,लाख अपमान,गरिबी,भेदभाव याचे असह्य चटके !यात तावून सुलाखून निघालेल्या सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजिरीने अवघा महाराष्ट्र पायदळी तुडवला,हजारो,लाखो लोक जमू लागले अन हे प्रबोधन होऊ लागले!या प्रबोधनकाराचे आत्मचरित्र बोले तैसा चाले ,,,,,याचे आज अकोट येथे प्रकाशन होत आहे.आमचे जिवलग मित्र वऱ्हाडी कवी,लेखक,गुल्लेरकार नरेंद्र इंगळे यांनी सत्यपाल महाराजांचे जीवनचरित्र रेखाटले आहे.वाह!काय अमृत योग आहे.नव्या पिढीच्या कामात हे पुस्तक येणार आहे.सत्यपाल महाराज यांच्या जीवनाची नव्याने उजळणी होणार आहे.खरा महाराज कसा असते हे लोकांना कळणार आहे.आता पोरगा सून,नातू सोडले तर कुणीच नाही हो सत्यपालाच!हो,बाबा गेले अवयव दान झाले,माय गेली,तीही मेडिकल कॉलेज ला दान झाली,बायको ,,,जीवापाड प्रेम करणारी,मायेनं जेऊ घालणारी सुनंदाबाई हार्ट अटॅक न गेली ,,,तिचेही देहदान अकोला मेडिकल कॉलेज ला,,,,,यालेच म्हणतात ना बोले तैसा चाले,,,,इतकंच नाई त आता महाराजांनी सुद्धा जाहीर केलं आहे, माय बाप हो प्रबोधन करता करता जथी माया जीव जाईल त्याच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज ला माया देह निऊन टाकजा,,,पौराईच्या कामात यिन नवीन डॉक्टर घळतील,समाजाची सेवा करतील,,,बॉंव हो मरावे पण कीर्ती रूपे उरावे,,,,मातीतला सत्यपाल मातीत जाईल पण अजरामर राईन !कौन की, चाळीस “पाल” म्या,सोळेल हायत,ते प्रबोधन करतील अन माय नाव मोठं करतील,,,,,,,!खरंच सत्यपाल महाराज आता महाराष्ट्र भूषण च्या ही वरती गेले आहेत,सिरसोलीगावाच्या मातीतील हिराआता खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील महाराष्ट्र भूषण ठरला आहे!

धनंजय मिश्रा,अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here