Home Breaking News महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने उद्या तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार वितरण व...

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने उद्या तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार वितरण व व्याख्यान

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या पत्रकार दिन सोहळ्यास उपस्थित रहावे- भाऊ भोजने

संग्रामपूर : महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिनाचा सोहळा 7 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आला आहे

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी घाटाखालील जळगाव जामोद, खामगाव आणि मलकापूर मतदारसंघात उत्कृष्ठ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांना तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांच्या निवासस्थानी पार पडेल. त्यावेळी मॅक्स महाराष्ट्र मुंबईचे पॉलिटिकल एडिटर राहुल पहूरकर हे ‘पत्रकारिता आज काल आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बहुजन महासंघाचे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांची उपस्थिती राहील तर जानराव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, लोकेश राठी तालुका अध्यक्ष भाजपा, शंकर पुरोहित संस्थापक-अध्यक्ष मित्र परिवार, सुनील वाकोडे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा, श्रीकांत विखे पोलीस उपनिरीक्षक तामगाव हे सुध्दा उपस्थित राहील. कार्यक्रमानंतर पत्रकारांसाठी स्नेहा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here