Home Breaking News बहुजनांचा उध्दार व्हावा याकरीता सातत्याने आवाज उठवत राहणार – नानाभाऊ पटोले

बहुजनांचा उध्दार व्हावा याकरीता सातत्याने आवाज उठवत राहणार – नानाभाऊ पटोले

कुणबी समाज सोयरीक पुस्तीकेचे थाटात प्रकाशन
खामगाव:- संत शिरोमणी तुकाराम महाराज विकास मंडळाच्या वतीने मागील १८ वर्षापासून सोयरीक पुस्तीकेचे प्रकाशन केले जात आहे.या उपक्रमामुळे वेळ व पैश्याची बचत होवुन अनेक युवक-युवतींचे लग्न जुळले आहे. मंडळाचा हा उपक्रम स्त्युत्य असून मंडळाने या उपक्रमासोबतच समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देखील खर्च करावा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी कुणबी समाज मंडळाला आपण ५ लक्ष रुपयांचा निधी देत आहो. तरुणांनी संस्काराचे पालन करुन बहुजन समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुध्द एकत्र यावे असे आवाहन प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केले.दि.२६ डिसेंबर रोजी नांदुरा रोडवरील जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी मंगल कार्यालय येथे संत शिरोमणी कुणबी समाज सोयरीक पुस्तीकेचे प्रकाशन सोहळा व उपवर युवक-युवती परिचय मेळावा पार पडला त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त आवाहन केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.बबनराव तायवाडे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल अंमलकार, महाराष्ट्र प्रदेष काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार बबनराव चैधरी, संत शिरोमणी कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राजाराम काळणे, सचिव मनोहरराव थेटे, संजय गांधी सुतगिरणीच्या अध्यक्षा अंजलीताई टापरे, कुणबी समाज शेगांवचे अध्यक्ष दयाराम वानखडे, कुणबी समाज मंडळाचे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव महाले, कुणबी समाज नांदुरा अध्यक्ष केदार ढोरे, सोनाजी महाराज संस्थान सोनाळाचे अध्यक्ष विश्वनाथ तिडके, कुणबी समाज अकोल्याचे अध्यक्ष महादेवराव कौसल, सामाजिक कार्यकर्ते अनंतराव भारसाकळे, कुणबी समाज जळगाव जामोद अध्यक्ष वाल्मीकराव ठाकरे, अॅड.शालीग्राम कळसस्कार, माजी जि.प.सभापती सुरेश वनारे,माजी जि.प.अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाशराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे दुःख मला माहित आहे. शेतकरी,बहुजनांना न्याय मिळावा म्हणून त्यासाठी आपण सातत्याने भुमिका मांडलेली आहे. लोकसभेत,विधानसभेमध्ये अनकवेळा आवाज उठविला. शेतकरी बहुजनांना न्याय मिळाला नाही म्हणून खासदारकी, आमदारकीचा राजीनामा सुध्दा दिला. समाजात जन्मल्यानंतर समाजाला देणं लागते ही भावना मनामध्ये ठेवुन बहुजनांचा उध्दार व्हावा याकरीता आपण सातत्याने आवाज उठवत राहणार असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेश एकडे यांनी आपल्या भाषणातून प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांचा परिचय करुन दिला. नाना पटोले हे ओबीसी समाज बांधवांच्या हक्काची लढाई लढत असून सर्व समाज बांधवांनी नानाभाऊंच्या पाठीशी उभे रहावे. जर २०२४ साली आपण जास्तीत जास्त आमदार निवडून दिले तर नानाभाऊ पटोले हे मुख्यमंत्रीदेखील होवु शकतात असे सांगुन त्यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले.
सर्वप्रथम प्रदेशअध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले असता फटाक्यांची आतिशबाजी करुन उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पुतळयाचे पुजन करुन माल्यार्पण केले. यावेळी नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते कुणबी समाज सोयरीक पुस्तीकेचे थाटात विमोचन करण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुणबी समाज दुत दिनदर्शीकेचे सुध्दा प्रकाशन करण्यात आले. या उपवर युवक-युवती परिचय मेळाव्यामध्ये ९८० युवक-युवतींनी नाव नोंदणी केली होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भरातुन जवळपास २ हजार पेक्षा जास्त कुणबी समाज बांधव-भगिणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरविंद शिंगाडे सर, विठ्ठल पाटेखेडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव मनोहरराव थेटे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राजाराम काळणे, उपाध्यक्षा विमलताई थोरात, कार्याध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव मनोहरराव थेटे, कोशाध्यक्ष डिगांबर कवडकार, शांताराम पाटेखेडे, रामदास इंगळे, गजानन ढोरे, मनोहराव काळणे, दिलीप मार्के, रमेश देवचे, प्रल्हाद उन्हाळे, प्रल्हाद जोहरी, प्रकाश हागे, डाॅ.दिलीप काटोले, रामेश्वर दुतोंडे, गजानन निर्मळ, सुखदेवराव आखरे, संजय शेळके, महादेवराव डिक्कर, माजी जि.प.सभापती सुरेष वनारे, मिराताई ढाकरे,चंद्रभागाबाई म्हस्के,विमल अढाव, आशा तिजारे यांच्यासह कुणबी समाज मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here