Home गौरव - पुरस्कार प्रशांत खत्री उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित

प्रशांत खत्री उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित

 

शेगाव : येथील प्रेस फोटोग्राफर प्रशांत खत्री यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने शेगाव पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन सोहळा कार्यक्रमांमध्ये १७ डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात आले आहे.
येथील वर्धमान भवन मध्ये पत्रकार दिनानिमित्त शेगाव गौरव पुरस्कार व सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकजपाल महाराज यांच्या सप्तखंजिरीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेशजी राजोरे, सौ.अपर्णाताई संजय कुटे, नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, रा.कॉ.महिला नेत्या सौ.नंदाताई पाऊलझगडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, निर्भया फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.कल्पनाताई मसने, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी, शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन, सचिव अमर बोरसे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन देशोन्नतीचे पत्रकार अमर बोरसे यांनी तर आभार महेंद्र मिश्रा यांनी मानले. शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन, सचिव अमर बोरसे, संजय त्रिवेदी, नंदू कुळकर्णी, राजकुमार व्यास, नानाराव पाटील, सिद्धार्थ गावंडे, ज्ञानेश्वर कुकडे, धनराज ससाने, ज्ञानेश्वर ताकोते प्रशांत घाटे, विनोद उमाळे, कैलास कळमकार, रोहित देशमुख, समीर देशमुख, देवीदास कळस्कार, इज्जत पुंडगे यांच्यासह शहरातील पत्रकार बांधवांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here