Home खामगाव - जालना रेल्वे खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी केंद्रसरकार निधी देण्यास तयार –ना.रावसाहेब दानवे पाटील 

खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी केंद्रसरकार निधी देण्यास तयार –ना.रावसाहेब दानवे पाटील 

 

शेगांव व जलंब येथील मेल व एक्सप्रेसचे थांबे पुर्ववत सुरु करण्यात यावे – आ.ॲड.आकाश फुंडकर
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मा.ना.श्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या अध्यक्षतेत आज दि.27 डिसेंबर 2021 रोजी खामगांव जालना रेल्वे सह इतर विषयांवर चर्चगेट येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की केंद्र सरकार खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी निधी देण्यास तयार असून राज्य सरकारने त्यांचा हिस्सा तात्काळ मंजूर केल्यास लवकरात लवकर कामास सुरुवात करता येईल. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव जालना रेल्वे मार्गासह खामगांव रेल्वे स्थानक, रेल्वे मालधक्का अध्यावत करणे, खामगांव येथील रेल्वे फाटक येथे अंडर पास करणे व जलंब रेल्वे स्थानक अध्यावत करणे या मागणीसह शेगांव जलंब येथे मेल व एक्सप्रेसचे थांबे पुर्ववत सुरु करण्याची मागणी देखील मांडली.

आज चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खामगांव विधासभा मतदार संघाचे आमदार ॲड श्री आकाश फुंडकर हे उपस्थित होते. खामगांव जालना रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक चर्चा होऊन केंद्रीय मंत्री रावसाहेब म्हणाले की, “खामगांव जालना रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार आपला वाटा देण्यास तयार आहे. राज्य सरकारने त्यांचा वाटा मंजूर करण्यात येऊन काम सुरु करण्याबाबत लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी जेणे करुन उपरोक्त रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरु करण्यात येईल.” त्यामुळे खामगांव जालना रेल्वेचा मार्ग मोकळा झालेला असून राज्य सरकाकडून निधी मंजूर करण्यासाठी बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री सर्व आमदार व खासदार यांचे शिष्टमंडळ भेट घेऊन विनंती करणार आहेत.
आजची ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून खामगांव जालना रेल्वे मार्गाबाबत लवकरच बुलढाणा जिल्हयातील रेल्वे प्रवाश्यांना खुश खबर ‍ मिळू शकते. तसेच या बैठकीत खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी रेल्वे प्रवाश्यांच्या विविध समस्य मांडल्या. यामध्ये नांदुरा येथील प्रवाश्यांसाठी वेटींग रुम व इतर बाबी, जलंब, शेगांव येथील मेल व एक्सप्रेसचे थांबे पुर्ववत सुरु करण्याची मांगणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी मा.मंत्री महोदयांना स्वतंत्र पत्र देखील दिले.
यासोबतच जलंब रेल्वे स्टेशन अद्यावत करणे, खामगांव रेल्वे स्टेशन अद्यावत करणे, खामगांव येथील माल धक्क्याचे बांधकाम करणे, खामगांव पोलीस स्टेशन ते समन्वय नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटका ऐवजी अंडर पास करणे या मागण्यांचे देखील आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी स्वतंत्र पत्र देऊन आग्रही मागणी केली. याबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील सकारत्मकता दर्शविली असून संबंधीतांना याबाबत अहवाल मागविण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे खामगांव येथील अनेक वर्षापासून रेल्वे संबंधीच्या विविध मागण्या लवकरच पुर्ण होती अशी अपेक्षा पल्लवित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here