Home खामगाव विशेष तेजेंद्रसिंह चौहान हे नाविन्यपूर्ण संकल्पना साकारून युवकांपुढे आदर्श निर्माण करीत आहे –...

तेजेंद्रसिंह चौहान हे नाविन्यपूर्ण संकल्पना साकारून युवकांपुढे आदर्श निर्माण करीत आहे – नानभाऊ पटोले

 

फिरते डिझेल पंपाचे विदर्भातील पाहिले स्टार्टअप चे उदघाटन सोहळा थाटात संपन्न

खामगाव :- “दिवसेंदिवस बेरोगारांची संख्या वाढते आहे, परंतु अश्या नवनवीन संकल्पना राबवून तेजेन्द्रसिंह चौहान यांनी युवकांसमोर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा एक आदर्श निर्माण करीत आहेत. असे प्रतिपादन फ्युअललीप लॉजिस्टिक प्रायव्हेट ली. या द्वारपोच डिझेल विक्री या स्टार्टअप कंपनीच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर द्वारपोच डिझेल पंप हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या रजत नगरीमध्ये फ्युअललीप लॉजीस्टिक प्रा.ली. या नावाने विदर्भातील फिरते डिझेल पंपाचे प्रथम स्टार्टअप तेजेंद्रसिंह चौहान यांनी सुरू केले. या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे भव्य उदघाटन सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.आ.श्री. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
विदर्भातील फिरते डिझेल पंपाचे पहिले स्टार्टअप फ्युअललीप लॉजीस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उदघाटन प्रसंगी पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले कि, “शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ज्ञानदान दत्तक उपक्रम राबवून सामाजिक भान जपण्याचे कार्य तेजेन्द्रसिंह चौहान लक्ष्मीनारायण संस्थेच्या वतीने करीत आहेत. भविष्यात यापेक्षा मोठे कार्य आपण करावे. तसेच कोरोनामध्ये बरीचशी कुटुंबे विस्कळीत झाली या सर्वांना मदतीचा हात प्रत्येकाने दिला पाहिजे, ” असे गौरोउद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी फ्यूअललीप लॉजीस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उदघाटन सोहळ्यामध्ये केले.
कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेल्या उज्वला रवींद्र पाचपोर हिला श्री. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसा निमित्त उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले यांच्याहस्ते गणवेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्वयंप्रेरणेने रोजगार उभारून आपल्या संसाराला हातभार लावणाऱ्या महिला सौ. मंगलाताई सपकाळ, सौ. सीमा भुतडा, सौ. प्राची कर्णिक, सौ. संगीता काळणे, सौ. पुष्पलता बागुल, सौ. स्मिता लांडगे, सौ. सुनिता प्रकाश जाधव, सौ. वनिता इंगळे तसेच कु. मोनिका बळीराम वानखडे हिला पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कामगिरी बद्दल स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदेशाध्यक्ष मा.श्री.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे दैवत विठ्ठलरुख्मिणी यांची चांदीने अलंकारीत मूर्ती व शाल-श्रीफळ देऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले यांचा सत्कार बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल तथा लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान व माणिनी ग्रुपच्या अध्यक्ष सौ. राजकुमारी चौहान यांनी केला. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित मलकापूर विधानसभेचे आमदार मा.श्री. राजेशजी एकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मा.श्री. संजयजी राठोड, पितृतुल्य मा.श्री. बाबुरावजी लोखंडकार, खामगाव विधानसभा पक्षनेते मा.श्री. ज्ञानेश्वर दादा पाटील, मलकापूर नगर परिषद अध्यक्ष मा.श्री. हरिषभाऊ रावळ, अ.भा. किसान काँग्रेस उपाध्यक्ष श्यामजी पांडे, महा. प्र. काँग्रेस कमिटी सचिव डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, सौ. जयश्रीताई शेळके, श्री. धनंजयजी देशमुख, श्री. रामविजय बुरुंगले, हाजी दादू सेठ, अकोला ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.अशोकजी अमानकार, बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी सहप्रभारी दिलीपभाऊ भोजराज, जेष्ठ नेते तथा नांदुरा कृ.ऊ.बा.स. मुख्य प्रशासक पद्माकरकाका पाटील, मा.श्री. विठ्ठलभाऊ लोखंडकार, मेहकर शहर कॉंग्रेस कमिती अध्यक्ष मा.श्री. पंकजजी हजारी आदींचा सत्कार तेजेंद्रसिंह चौहान, सौ. राजकुमारी चौहान व पदाधिकारी आणि लक्ष्मीनारायण ग्रुपच्या वतीने करण्यात आला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास पल्हाडे तर आभार प्रदर्शन सौ. राजकुमारी चौहान यांनी केले. यावेळी उदघाटन सोहळ्यास बु.जि. कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री. तुळशीराम नाईक, श्री. राजेश पोलाखरे, खामगाव बार असोशिएशन चे अध्यक्ष अॅड. मनदिपसिंग चव्हाण, मलकापूरचे नगर सेवक अनिलजी गांधी, मेहकर न.प. नगरसेवक संजय ठाकरके, निलेश सोमण, निलेश मानवतकर, पांडुरंगजी राखोंडे, मधुकर काका चोपडे, श्री. गौतम गवई, मिलिंद जैस्वाल, राजूभाऊ पाटील, अन्सार बाबू, अच्छे खान पठाण, प्रकाश दांडगे, श्रीकृष्ण मोरे, नांदुरा शहर कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष विनलकुमार मिरगे, विजय बोदडे, सुरेश इंगळे, अॅड. अशोक इंगळे, अॅड. अविनाश इंगळे, श्री. सचिन जैस्वाल, खामगाव तालुका कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष सोपान पाटील, मनोज भोजने आदि पदाशिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here