Home खामगाव विशेष नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार विदर्भातील पहिल्या स्टार्टअप फिरते डिझेल पंपाचे उदघाटन

नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार विदर्भातील पहिल्या स्टार्टअप फिरते डिझेल पंपाचे उदघाटन

खामगाव :- बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस सेवादल व लक्ष्मीनारायण ग्रुपचे अध्यक्ष तेजेन्द्रसिंह चौहान यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतील विदर्भातील फिरते डिझेल पंपाचे पहिले स्टार्टअप फ्युअललीप लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे उदघाटन रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार आहे.
बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेन्द्रसिंह चौहान यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतील फिरते डिझेल पंपाचे विदर्भातील पहिले स्टार्टअप फ्युअललीप लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे भारत कॉर्पोरेशन कंपनी लिमिटेड यांच्या सोबत डिझेल विक्रीस करारबद्ध झालेली आहे. विदर्भातील पहिले स्टार्टअप फ्युअललीप लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे उदघाटन रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष मा.श्री. राहुलभाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेत व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष मा.श्री. संजयजी राठोड, मलकापूर विधानसभा आमदार मा.श्री. राजेशजी एकडे, खामगाव विधानसभा पक्षनेते मा.श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील, मलकापूर नगरीचे नगराध्यक्ष अॅड. हरीषभाऊ रावळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव धनंजयजी देशमुख, खामगाव तालुका कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ. सदानंदजी धनोकार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, दूरदर्शन केंद्रजवळ, वामन नगर, खामगाव येथे उदघाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे.


खदान चालक, ग्रामीण भागातील शेतकरी वाहन चालक, ट्रॅक्टर चालकाना तसेच ट्रक-बस-लक्झरी चालक यांना आता वेळ खर्च करीत डिझेल पंपावर जाण्याची गरज उरणार नाही. स्टार्टअप फ्युअललीप लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे फिरते डिझेल पंप ग्रामीण भागातील गावागावात जाऊन मागणी प्रमाणे त्यांना माफक दरामध्ये डिझेल मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची विशेषतः वाहन चालकांना दिलासा मिळणार असून रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे लाडके नेते मा.श्री. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते फिरते डिझेल पंप फ्युअललीप लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे उदघाटन होणार आहे. नागरिकांनी सुद्धा उदघाटन समारंभास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन संचालक तेजेन्द्रसिंह चौहान आणि संचालिका सौ. राजकुमारी चौहान यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here