Home Breaking News बहुचर्चित ‘फ्रॉड रॅकेट’ची शेगावात धोखाधडी !खोटी व्यक्ती उभी करून प्लॉटची झाली विक्री...

बहुचर्चित ‘फ्रॉड रॅकेट’ची शेगावात धोखाधडी !खोटी व्यक्ती उभी करून प्लॉटची झाली विक्री ; आधार आणि पॅन कार्ड बनावट!

 

➡️ दुर्लक्षित प्रॉपर्टी वर डोळा ठेवून खोटे कागदपत्र तयार करून विक्री करणारी टोळी सक्रिय

➡️ दुय्यम निबंधकांकडे तक्रार दाखल

➡️ आणखी ६ प्रकरणे बाहेर निघण्याची शक्यता

खामगाव : प्रशासनाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे ‘फ्रॉड रॅकेट ‘ गेल्या अनेक वर्षापासून प्रॉपर्टी व्यवसायात धोखधडीचे काम करत आहे. अशी काही प्रकरणे यापूर्वी उघडकीस आलेली असतानाही त्यांचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे. दुर्लक्षित प्रॉपर्टी शोधायची, त्यांचे मालक बाहेरगावी किंवा मयत असले की त्यांच्या नावाने खोटे व बनावट आधार कार्ड ,पॅन कार्ड, दस्तऐवज बनवून, खोटी व्यक्ती उभी करून प्रॉपर्टी विकायची अशा प्रकारे हे लोक फसवणूक करतात. दरम्यान आता शेगाव शहरात अशा पद्धतीने सहा व्यवहार केले गेले असून याप्रकरणी दुय्यम निबंधक यांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे. आता या प्रकरणात मोठे घबाळ समोर येण्याची शक्यता आहे.

या घटनेची हकीकत अशी की शेगाव येथे
खोटे व बनावट व्यक्ती मार्फत गैरकायदेशीर खरेदीखत नोंदवील्याचा गेला असल्याबाबत मंगेश ढोले यांची दुय्यम निबंधक, तहसीलदार, मुद्रांक जिल्हाधिकार्याकडे तक्रार केली आहे. शेगांव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाने दस्त क.३६६० / २१ नुसार गैरकायदेशीर खरेदीखत नोंदवीलेले आहे. भारतीय नोंदणी कायदयाचे कलम ३४ ‘३’ ‘ब’ नुसार नोंदणी निबंधकाने त्याचेसमोर येत असलेल्या व्यक्तीची जो दस्त लिहुन देत आहे त्याची ओळख – पटविणे संबंधित अधिकारी यांची जबाबदारी असते. असे असतांना देखील दस्त क.३६६० / २१ नोंदवीतांना लिहुन देणार सौ. सुरेखा विउठ्ल धामोडे यांचे ऐवजी खोटी महीला उभीकेली ती सुरेखा अशोक हागे या नावाची
व्यक्ती आहे. खोटी व्यक्ती सुरेखा धामोडे या नावाने उभी करून अंकुश भगवानराव जाधव व सौ. स्वाती अंकुशराव जाधव यांना कसबे एक प्लॉट विकला गेला. शेगांव भाग २ मधील न.प. हददीचे आतील भुमापन क.३७६/१ मधील स्नेह नगर मधील हे प्लॉट नं. ४६
आहे. खोटी व्यक्ती उभी करून जर कोणी खरेदीखत नोंदवुन देत असेल तर त्यावर भारतीय दंड विधानाचे कालमानुसार कारवाही करता येते तरी याबाबत देखील गांभीर्याने चौकशी करावी व संबंधीतांवर कारवाही करावी अशी मागणी पत्रकार मंगेश ढोले यांनी केली आहे.

व्यवहार घडविणारी व्यक्ती खामगावचा!

दरम्यान या प्रकरणात सूत्रधार असलेला व व्यवहार घडवून आणणारा व्यक्ती हा खामगाव येथील असल्याची माहिती समोर येत आहे. दस्त नोंदणी करताना संबंधित व्यक्ती दुय्यम दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणात मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here