Home Breaking News ‘या’ गावात वाघ दिसला: गावकऱ्यांनी माहिती देताच पोहचली रेस्क्यू टीम!!

‘या’ गावात वाघ दिसला: गावकऱ्यांनी माहिती देताच पोहचली रेस्क्यू टीम!!

 

शेगाव तालुक्यातील मानेगाव   शिवारात २o डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान शेतात काम करणार्‍या नागरिकांना वाघ  मोहन प्रल्हाद रहाटे यांच्या शेताजवळ  मानेगाव शेगाव गाड रस्त्याने दिसला, अशी चर्चा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घटनेची माहिती तहसीलदार समाधान सोनवणे व वन अधिकारी दीपक शेगोकार यांना देण्यात आली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मानेगाव शेती शिवारात वनविभागाची शोधमोहीम टीम पाठवली. त्यादरम्यान त्यांना वाघाच्या पाऊलखुणा दिसून आलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात वाघ दिसलेला नाही. वाघ मन नदी कडे गेल्याची शक्यता आहे अशी माहिती वन अधिकारी दीपक शेगोकार यांनी दिली. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर पथक खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांचे मार्गदर्शनात वन अधिकारी दीपक शेगोकार; बुलढाणा येथील रेस्क्यू पथक टीम; खामगाव चे वनमजूर मिलिंद इंगळे; शिवाजी उमाळे यांनी मानेगाव शिवारात वाघ आढळून आल्याचे माहिती वन अधिकारी दीपक शेगोकार यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here