Home Breaking News व्हाट्सअप वर लग्न जुळलं ; मात्र नंतर भलतंच घडलं!

व्हाट्सअप वर लग्न जुळलं ; मात्र नंतर भलतंच घडलं!

 

खामगाव:-व्हाट्सएपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी ओळख इंदोर येथील शर्मा परिवारास चांगलंच महागात पडलं आहे.अज्ञात व्यतीने व्हाट्सएपवर मुलीचा फोटो पाठवून शर्मा परिवारातील मुलाशी लग्न लावून देतो अस सांगत थेट बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोलोरी या गावात बोलावून जवळपास एक लाखाने लुटलं असून फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अज्ञातांनी पोबारा केला.इतकंच नाही तर कोलोरी गावात या बाबतीत शर्मा कुटुंबीयांनी विचारणा केली असता त्यांना मारहाण करण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार इंदोर येथील विशाल शर्मा या युवकाला लग्न लावून देतो म्हणून आधी व्हाट्सएपच्या माध्यमातून मुलीचा फोटो पाठविला व नंतर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोलोरी या गावात बोलावून काही जणांनी मारहाण करून त्यांच्याकडून साठ हजार रुपये व सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला आहे. गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रातील काही जण इंदोर येथील या युवकाच्या संपर्कात होते त्यांनी इंदोर येथील शर्मा परिवाराला कोलोरी येथे बोलावून एका मुलीशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने बोलावले म्हणून इंदोर येथून विशाल शर्मा त्यांची बहीण किरण शर्मा अधिक दोघे असे चौघे जण इंदोर येथून काल सकाळीच खामगाव तालुक्यातील कोलोरी या गावात बोलावण्यात आले , तिथं आधीच लग्नाची मुलगी व तिघे जण एका घरात होतेच.त्यांनी दुपारी विशाल शर्मा याच गावातील एका पडक्या घरात लग्न देखील लावून दिले. पण नंतर त्यांच्याकडून साठ हजार रुपये व सोन्याचे दागिने घेऊन मुलीसह हे भामटे गावातून पसार झाले.फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शर्मा कुटुंबीयांनी गावातील काही नागरिकांना या अज्ञाताबद्दल विचारणा केली असता त्यांना विशाल शर्मा व किरण शर्मा यांना मारहाण केली. शर्मा कुटुंबाला आपली फसवणूक झाल्याचं समजताच शर्मा कुटुंब पोहचला थेट खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी विशाल जगदिश शर्मा वय 37 वर्ष धंदा-मजुरी रा. श्रीनगर काकड एलआय जी स्क्वेअर इंदौर (मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून
उपरोक्त आरोपी सुरेश जाधव रा अकोला याच्यासह सहा जणांविरुद्ध कलम 406, 324, 323, 34 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांचे दोन पथक या भामट्यांच्या मागावर पाठविले आहेत.एकंदरीत समाज माध्यमातून झालेली ओळख विशाल शर्माला चांगलीच महागात पडली असून आता शर्मा कुटुंबियांवर खामगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here