Home आंदोलन खामगावात मराठ्यांची शिवगर्जना ; कर्नाटकातील घटनेच्‍या निषेधार्थ मराठा महासंघाचे आक्रोश आंदोलन

खामगावात मराठ्यांची शिवगर्जना ; कर्नाटकातील घटनेच्‍या निषेधार्थ मराठा महासंघाचे आक्रोश आंदोलन

आरोपींवर कठोर करावाईची मागणी
खामगाव, ः संपुर्ण हिंदूस्‍थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या कर्नाटक राज्‍यातील बेगंळूर येथील पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेच्‍या निषेधार्थ १९ डिसेंबर रोजी खामगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्‍या वतीने जोरदार आक्रोष आंदोलन करण्यात आले. यावेळी तीव्र घोषणाबाजी करुन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.


कर्नाटक राज्‍यातील बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अश्वारुढ पुतळ्याची काही माथेफिरुंनी विंटबना केली. या घटनेच्‍या निषेधार्थ आज मराठा महासंघाच्‍या वतीने जनआक्रोष आंदोलन करण्यात आले. सर्वप्रथम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्‍टेडीयमवरील छत्रपतींच्‍या अश्वारुढ पुतळ्याला दुग्‍धाभिषेक करुन तीव्र घोषणाबाजी करीत रोष व्‍यक्‍त करण्यात आला.

यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी यांच्‍या मार्फत महामहीम राज्‍यपाल व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लेखी निवेदन देवून महापुरुषांची विटबंना करणाऱ्या दोषींवर तात्‍काळ कठोरात कठोर कारवाई करुन समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मनोवृत्‍तीला चपराक बसावी अशी कारवाई करावी व संपुर्ण शिवप्रेमींच्‍या भावनांना न्‍याय मिळून द्यावा. जर दोषींवर तात्‍काळ कायदेशिर कारवाई न केल्‍यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह, सर्व स्तरातील कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

पहा व्हिडीओ-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here