Home खामगाव विशेष सत्याचा लढा यशस्वी; कामगारांच्या अनेक मागण्या शिवांगी कंपनी कडून मान्य; काम बंद...

सत्याचा लढा यशस्वी; कामगारांच्या अनेक मागण्या शिवांगी कंपनी कडून मान्य; काम बंद आंदोलन मागे!

 

खामगाव :येथील शिवांगी बेकर्स,पारले कंपनीच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या सभासद स्वीकारलेल्या कामगारांनी विविध मागण्या करिता गेल्या दहा दिवसापासून कंपनी समोरच भव्य मंडप टाकून मनसेच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन सुरू केले होते त्यामुळे कंपनी दहा दिवसापासून पूर्णत बंद होती अखेर कंपनीने नरमाईची भूमिका घेत मनसे पदाधिकारी व कामगारांना चर्चा करण्याकरिता आज सकाळीच कंपनीच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस निलेश पाटील,अक्षय पनवेलकर,सह मनसे पक्षाचे उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडकार यांनी कंपनीतील कामगार गोपाल चरखे, दिपक वानखडे, गजानन घ्यार, दीपक मोडकर, दिलीप गीड्डे, निलेश श्रीनाथ, यांच्यासह इतर दहा कामगारांना एकत्र घेऊन सकाळपासून कंपनी संचालकांशी कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात कंपनीच्या ऑफिस मध्ये बसून कामगारांन समक्ष चर्चा सुरू केली .

अखेर संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान कामगारांच्या काही मागण्या कंपनी संचालकांनी मान्य केल्या आहेत तर काही मागण्या कंपनी मालकाने मान्य करण्यास नकार दिला त्या मागण्या न्यायालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कायदेशीर लढा देऊन सोडवेल असे कामगारांमध्ये ठरले कामगारांच्या बर्याच मागण्या कंपनीने मान्य केल्याने कामगारांनी समाधान व्यक्त करत काम बंद आंदोलन करणाऱ्या कंपनीच्या सर्व कामगारांनी आंदोलन मागे घेत उद्यापासून कामावर जाण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेल्या शिवांगी बेकर्स पारले कंपनी आता उद्यापासून सुरळीत सुरु होणार आहे.

शिवांगी ब्रेकर्स कंपनीने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या हा तर कामगार एकजुटीचा विजय अशी प्रतिक्रिया मनसे कामगार संघटनेचे चिटणीस निलेश पाटील व मनसे उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडकार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here