Home Breaking News दहा लाख रुपयांचा गांजा पकडला ; महिलेसह तिघांना अटक

दहा लाख रुपयांचा गांजा पकडला ; महिलेसह तिघांना अटक

खामगाव : अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाने अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून दररोज अशा व्यवसायांवर कारवाई केल्या जात आहे दरम्यान आज परराज्यातून बुलढाणा जिल्ह्यात आलेला 10 लाख रुपये किमंतीचा 1 विक्टल गांजा बुलढाणा पोलिसांनी पकडला आहे याप्रकरणी पोलीसांनी 3 जणांना अटक केली आहे अटक केलेल्या तिघांपैकी एक महिला आहे

परराज्यातून हे तिघे जण बुलढाणा जिल्ह्यात गांजा घेऊन येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील किन्ही महादेव फाटयाजवळ रात्री 3 वा नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबले असता त्यांच्या जवळुन 10 लाख एक क्विंटल गांजा सुमारे किंमत दहा लाख रुपये जप्त केला आहे या प्रकरणी तीन व्यक्तींविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून तिन्ही आरोपी अटक करण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलिस नाईक नंदकिशोर आंधळे, राजू आडवे, पोलिस कर्मचारी कैलास ठोंबरे यांनी केली. तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन वाघ व त्यांच्या पथक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here