Home खामगाव तालुका कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये पदवी प्रवेशकरिता मुदतवाढ

कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये पदवी प्रवेशकरिता मुदतवाढ

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरूंचा महत्वपूर्ण निर्णय

खामगाव :- महाविद्यालयास प्राप्त झालेल्या कुलगुरूंच्या महत्वपूर्ण निर्णयाच्या पत्रकानुसार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये बि.ए., बि.कॉम., बि.एस्सी., बि.सि.ए., बि.बि.ए. मध्ये प्रवेश घेण्याकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2021-22 करीता महाविद्यालय उशिरा प्रवेश अंतिम तिथीत वाढ करण्यात आली असून 24 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
कोव्हीड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विलंबाने लागलेले निकाल व त्यामुळे विद्यार्थ्यांना येणा­या अडचणी तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता आणि विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये व कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरीता विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अंतिम तिथीत वाढ केली असून ती आता दि. 24 डिसेंबर, 2021 करण्यात आली आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, संलग्नित महाविद्यालयांतील इतर सर्व अभ्यासक्रमातील विद्याथ्र्यांना (विद्यापीठ शैक्षणिक विभाग व ज्या अभ्यासक्रमाचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने होतात, असे अभ्यासक्रम वगळून) शैक्षणिक सत्र 2021-22 करीता उशिरा प्रवेश देण्याची अंतिम तिथी दि. 06 डिसेंबर, 2021 पर्यंत कळविण्यात आली होती.
महाविद्यालयांना आपले प्रवेश दि. 24 डिसेंबर, 2021 पूर्वी पूर्ण करावयाचे आहेत. यानंतर कुठल्याही परिस्थितीत अंतीम तिथीत वाढ केल्या जाणार नाही, याची सुद्धा नोंद विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांनी घ्यावयाची आहे.
तरी सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी व विद्याथ्र्यांनी विहित मुदतीत आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहिती करिता 07263-295566, 9423601256 किंवा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, दूरदर्शन केंद्राजवळ, वामन नगर, खामगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य कॉलेन ऑफ मॅनेजमेंट, खामगाव च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here