Home Breaking News होय मी भुतच ..तुम्हाला भूतीन म्हटलं तर! बच्चुभाऊंचा यशोमती ताईंना करारा जवाब...

होय मी भुतच ..तुम्हाला भूतीन म्हटलं तर! बच्चुभाऊंचा यशोमती ताईंना करारा जवाब ; आघाडीच्या दोन मंत्र्यांतच जुंपली !!

श्रीधर ढगे पाटील

संग्रामपूर : आमच्या जिल्ह्यातील एक भूत संग्रामपूर मध्ये येणार आहे, असे वक्तव्य महिला व बाल कल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी येथे केले होते. त्यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले अमरावती हा संतांचा जिल्हा आहे. मी सुद्धा पंचमहाभूतांपैकी एक आहे भुतच आहे. यशोमती ठाकूर आमच्या आदरणीय आहेत, मात्र अशा खालच्या पातळीची भाषा वापरणे ही कॉंग्रेसची संस्कृती नाही. बुलढाणा जिल्हा जिजाऊंचा जिल्हा आहे. त्यामुळे आम्ही महिलांबाबत चुकीचे वक्तव्य करणार नाही मात्र यानंतर यशोमती ताई यांनी खालच्या पातळीचे वक्तव्य केले तर आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सत्ता द्या शहर समस्या मुक्त करू!

संग्रामपूर सर्वांगीण विकास साध्या चा असेल तर जाती धर्म बाजुला ठेवून प्रहार जनशक्ती पक्ष व संग्रामपूर मित्र परिवाराच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून सत्ता आमच्या हाती द्या शहर समस्यामुक्त करू असे असे प्रतिपादन शालेय शिक्षण जलसंपदा मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा बच्चु भाऊ कडु यांनी केले.

संग्रामपूर येथे आठवडी बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्ष व संग्रामपूर मित्र परिवाराच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर आयोजित करण्यात आली होती. यावेळी भरगच्च उपस्थिती होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी संग्रामपूरचे जेष्ठ नागरिक शालिग्राम वेरुळकार होते. मंचावरवर आरोग्य मित्र संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकर पुरोहित प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र सचिव गणेश पुरोहित, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने, प्रहारचे जिल्हाअध्यक्ष वैभव मोहिते, महाराष्ट्र सहसचिव रवि ठाकुर, गजानन लोखंडकार यांच्यासह संग्रामपूर शहरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवर नेत्यांची भाषणे झाली. संग्रामापूर शहर विकासाच्या बाबतीत अद्यापही मागे आहे. आम्हाला निवडून दिल्यास शहरातील विकासाची कामे मार्गी लावत शिक्षण आरोग्य यासह सर्वच मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आरोग्य सुविधेसाठी शहरातील नागरिकांनी शंकर पुरोहित यांच्याशी संपर्क साधावा त्यांना योग्य ती मदत केली जाईल असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले.
सभेचे प्रस्ताविक हमीद पाशा यांनी केले सभेचे सुत्रसंचलन रामेश्वर गायकी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा हरिभाऊ तायडे यांनी मानले.सभेला संग्रामपूर शहरातील नागरिकांची मोठी गर्दी होती.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here