Home जागर सेफ्टी टँक मध्ये पडलेल्या गायीला एकनिष्ठा ने दिले जीवनदान

सेफ्टी टँक मध्ये पडलेल्या गायीला एकनिष्ठा ने दिले जीवनदान

 

खामगांव: गौ-सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशनच्या गौ-सेवकांनी गायीला दिले जीवनदान सिव्हील लाईन स्थित केला पोस्ट जवळील फ्रेंड्स अपार्टमेंट कंपाऊंड मधील सेफ्टी टँकचा स्लॅब वर एक गाय चढली होती स्लॅब कोसळून गाय सेफ्टी टँक खाली दबून स्लॅब तिच्या अंगावर पडलेला होता ती भयंकर स्थितीत दबून कोंबलेली होती.

घटनेची माहिती दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशनला मिळताच सुरजभैय्या यादव यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता व तसेच त्यांचे सहकारी आयुष सराफ, चंद्रकांत गांधी, पंकज देवगिरीकर, किशोर सारसर अजून दोन गौ सेवकांनी गौ-मातेला अवघ्या 15 मिनिटात गायीला सुखरूप बाहेर काढून दिले जीवनदान या गौ-सेवेचे खामगांव शहरात कौतुक करण्यात येत आहे अशी माहिती चंद्रकांत गांधी यांनी दिली. तसेच अश्या प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी व स्वजवाबदारीने गौ-वंशाचे रक्षण करावे असे आवाहन एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here