Home Breaking News नंदू भट्टड का नाद खुळा; भ्रष्ट लागोसे है भिडा!

नंदू भट्टड का नाद खुळा; भ्रष्ट लागोसे है भिडा!

अडते बद्रीनारायण राठी त्यांचा अडत परवानासाठी ” स्टे “अर्ज नामंजूर

कुउबास यार्ड मध्ये गैरकारभार ; हिशोबपट्टी कमी तर बिल जास्त दराचे बनविने भोवले !
खामगाव – स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडते बद्रीनारायन राठी यांच्या अडतेचा परवाना नंदलाल भट्टड यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने बाजार समितीने 10 नोव्हेंबर रोजी पुढील आदेशापर्यंत रद्द केला होता. सदर आदेश च्या विरोधात प्रो.प्रा.ललित बद्रीनारायन राठी यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खामगाव यांच्याकडे आदेशाला
अंतरिम स्थगिती मिळण्याकरिता अर्ज सादर केला होता. परंतु त्यांचे अनेक गैरकारभार बाजार समितीने सुनावणीदरम्यान लेखी स्वरूपात मांडले असता , त्यांनी वित्तीय वर्ष 21 – 22 मध्ये विनापरवाना व्यवसाय केल्यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये अनेक बिले बाजार समितीमध्ये सादर केले नाहीत. तसेच अनेक हिशोब पट्ट्या सुद्धा सादर केल्या नाहीत तर हिशोब पट्टी कमी दराची व बिल जास्त दराचे तसेच हिशोब पट्टी कमी वजन व बिल जास्त वजनाचे असेही दिसल्याचे गोषवारा मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. सदर सर्व व्यवहार लक्षात घेता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी त्यांचा परवानासाठी आलेला अंतरिम स्थगिती अर्ज 15 डिसेंबर रोजी नामंजूर केला आहे. संबंधित अडत्याला गाळा का ताब्यात घेण्यात येऊ नये, याकरिताही खुलासा मागविण्यात आला आहे त्यांनी खुलासा दिलेला नाही तरी पुढील कारवाई झालेली नाही.

 

कास्तकारांची लूट करणारा अडत्या राठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा – नंदू भट्टड

बद्रीनारायण राठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा ; परवाना नसताना व्यापार करणे तसेच बाजार समिती व शासनाच्या आर्थिक नुकसान करून शेतकऱ्यांच्यां मालात भाव व वजन फरक करून लूट करणारे अडते बद्रीनारायण राठी प्रो.प्रा. ललित ब राठी यांच्यावर कायदेशीर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी तसेच झालेल्या नुकसानाची वसुली करावी करावी व त्यांच्याकडे असलेले बाजार समितीचा गाळा व उर्वरित हिशोब पट्टी बिले तात्काळ जप्त करावे जेणेकरून सदर अडते अजून कुठलाही गैरव्यवहार करू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here