Home खामगाव विशेष सीए सौ स्नेहा चौधरी यांची भाजयुमोच्या युवती मोर्चा जिल्हा संयोजक पदी निवड

सीए सौ स्नेहा चौधरी यांची भाजयुमोच्या युवती मोर्चा जिल्हा संयोजक पदी निवड

खामगाव : भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व युवती प्रमुख मिनाताई केदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
भाजपा युवा मोर्चाच्या युवती मोर्चा जिल्हा संयोजक पदी खामगांव येथील सीए सौ स्नेहा चौधरी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या आदेशान्वये व भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व युवती मोर्चा प्रमुख मिनाताई केदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र काल दि.15डिसेंबर 2021 रोजी प्रदान करण्यात आले.


यावेळी भाजपा विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस शिवाणीताई दाणी प्रदेश उपाध्यक्ष बादल कुलकर्णी यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, खामगांव भाजयुमोचे शहराध्यक्ष राम ‍ मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांच्यासह प्रदेश पदाधिकारी व विदर्भातील जिल्हाध्यक्ष व महामंत्री यांची उपस्थिती होती.
सीए सौ स्नेहा चौधरी अग्रवाल यांच्या युवती मोर्चाच्या जिल्हा संयोजक पदी नियुक्तीने जिल्हयातील भाजपा युवती मोर्चाच्या नवीन बांधणीस मदत होणार आहे. येत्या काळात जिल्हयातील भाजपा युवती मोर्चा अधिक मजबूत होणार असल्याची आशा त्‍यांच्या नियुक्ती नंतर करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here