Home जळगांव जा आ.डॉ. संजय कुटे यांच्या कडून विठ्ठल निंबोळकर यांचा सन्मान !

आ.डॉ. संजय कुटे यांच्या कडून विठ्ठल निंबोळकर यांचा सन्मान !

 

जळगांव जा : राष्ट्रीय चर्मकार संघाच्या प्रदेश सदस्य तथा विदर्भ प्रवक्ते व प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल जळगाव जा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कुटे यांच्याकडून पत्रकार विठ्ठल निंबोळकार यांचा सन्मान करण्यात आला आहे. बुधवारी रोजी आ. कुटे यांनी त्यांच्या निवास्थानी विठ्ठल निंबोळकार यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. युवा पिढीने सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करावे. तसेच वंचित शोषितांच्या न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करण्याचे आहवान यूवकांना त्यांनी यावेळी केले. राष्ट्रीय चर्मकार संघाने विठ्ठल निंबोळकार यांच्यावर खांद्यावर सोपविलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडतील यात शंका नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. यावेळी डॉ संजय कुटे यांनी विठ्ठल निंबोळकार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आ. कुटे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख, जिल्हा सदस्य डॉ. गणेश दातीर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here