Home Breaking News नकली नोटा प्रकरणात ‘हा’ मोठा खुलासा!

नकली नोटा प्रकरणात ‘हा’ मोठा खुलासा!

दोघांवर गुन्हे दाखल ; 61 लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव : शहरात बुधवारी सायंकाळी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडलेल्या इंडिका कार मध्ये नकली नोटा आढळून आल्या होत्या. दरम्यान या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 61 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत कर्तव्यदक्ष अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व दत्त मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत मोठा खुलासा झालेला असून एक आरोपी हा शेगाव येथील विश्रामगृहावरील कर्मचारी खानसामा असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची हकीकत अशी की अकोला येथून एका प्रवासी कार मध्ये नकली नोटा आणल्या जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे बुधवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पोलीस पथक वाहनाचा शोध घेत असतांना MH 30- AF 42 95 क्रमांकाची इंडिका कार पोलिसांना दिसली. पोलिसांनी टेंभुर्णा फाट्यापासून या इंडिका कारचा पाठलाग चालू केला. पोलीस मागे असल्याचे समजतात चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवणे सुरू केले. कार मधील एकास बाळापुर नाका भागाजवळ उतरून दिले व नंतर भरधाव वेगात कार रेखा प्लॉट बर्डे प्लॉट मार्गाने बुलढाणा रस्त्यावर वळवली. भरधाव जात असलेली कार पाहून कारचा पोलिसांनी पाठलाग करून देशमुख जवळ पकडली. दरम्यान याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती चौकशीअंती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातून भरधाव जाणाऱ्या कारची धडक पत्रकार विक्रम अग्रवाल व त्यांच्या कविता अग्रवाल यांना लागली असती, मात्र थोडक्यात ते वाचले.

पोलिसांनी नोंदविला गुन्हा

नकली नोटा प्रकणात शेगांव येथील शासकीय विश्राम भवनचा खानसामा अशोक रामचंद्र मोरे आणि गजानन कॉलनी भागातील अनिल भिकाजी हेरोडे यास अटक करण्यात आली. त्यांच्या कडून 61लाख 65 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल आणि नकली नोटा चलन जप्त करण्यात . त्यांच्यावर कलम 489 अ ब क , 279, 336 सह कलम 184 ,132 कलमन्वे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here