Home जागर महाराष्ट्राच्या राजधानीत राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ राजेश मिरगे सन्मानित

महाराष्ट्राच्या राजधानीत राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ राजेश मिरगे सन्मानित

 

मुंबई : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे द्वारा पद्मभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित” माझ्या शब्दात शरद पवार “या लेख स्पर्धेत राज्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. राजेश मिरगे यांचा नेहरू सेंटर मुंबई येथे पवारांच्या81 व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल स्मृतिचिन्ह सन्मानपत्र तथा 20 हजार रुपयाचा धनादेश सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला .

प्राध्यापक, शिक्षक व पत्रकार या वर्गवारीतून संपूर्ण राज्यातून सुमारे पाचशेहून अधिक लेख शरद पवार यांच्या साठ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीतील विविध निर्णयांचा समाज मानसावर झालेला विकासाभिमुख परिणाम या विषयावर प्राप्त झाले होते . यात डॉ.मिरगे यांनी पवारांच्या संपूर्ण संसदीय कारकीर्दीच्या निर्णयांचे अभ्यासपूर्ण व निपक्ष विचार मांडले . सदर स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त लेख तथा काही निवडक एकूण बत्तीस लेख संग्रहाचे “माझ्या शब्दात शरद पवार “या पुस्तकाचे मराठी, हिंदी इंग्रजी, उर्दू या चार भाषेत याचा अनुवाद करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या शुभ हस्ते प्रकाशन सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ,आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्राहक कल्याण मंत्री छगनराव भुजबळ ,खासदार सुप्रियाताई सुळे ,खासदार अमोल कोल्हे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ राजेश मिरगे हे राजकीय, सामाजिक, इतिहासाचे संशोधक, अभ्यासक असून त्यांचे विविध क्षेत्रातली लेखन व स्तंभलेखन गाजलेले लोकप्रिय आहेत. संत साहित्यातील लेखनाबद्दल त्यांना विशेष पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here