Home बुलडाणा जिल्हा वृत्त खामगांवात भाजपाचा जल्लोष भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांच्या नियोजनाचे कौतुक

खामगांवात भाजपाचा जल्लोष भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांच्या नियोजनाचे कौतुक

विधान परिषदेच्या नागपूर व अकोला मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय

राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 3 जागा बिनविरोध निवडल्या गेल्यानंतर सर्वांचे लक्ष आज लागणाऱ्याकडे नागपूर व अकोला विधानपरिषदेच्या निकालाकडे लागले होते. या दोन्ही जागांवर भाजपाने दणदणीत विजय ‍मिळवून महाविकास आघाडीला दणका ‍ दिला आहे. नागपूर येथून भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काँग्रेसपक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला तर इकडे अकोला येथून 18 वर्षापासून विधान परिषदेवर निवडून जाणारे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करत भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी 110 मतांनी पराभव केला आहे. या विजयात बुलढाणा जिल्हयाचा सिहाचा वाटा आहे असे बोलल्या जाते यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांचे कुशल नियोजनाचे कौतुक केल्या जात आहे.
नागपूर येथून भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काँग्रेसपक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला असून त्यांनी विजयानंतर प्रतिक्रीया देतांना म्हटले की काँग्रेसच्या हुकूमशाही व मुघलशाहीला कंटाळून मतदारांनी भाजपावर विश्वास टाकला असून येथून पुढे विजयाची घोडदौड अशीच सुरु राहणार आहे. विदर्भातील दोन्ही जागावर भाजपाने विजय मिळविल्यामुळे विदर्भातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. आज भाजपा कार्यालय खामगांव येथे भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगर सेवक, जि.प.सदस्य, पं.स. सदस्य यांनी एकत्र येऊन एकच जल्लोष केला. यावेळी फटाके फोडून भाजपाचे झेंडे फडकवत जल्लोष साजरा केला. भाजपा प्रेमींनी ढोल ताश्याच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला. मागील 18 वर्षापासून विधान परिषदेवर निवडून जाणारे अकोला ‍ विधान परिषदेचे गोपीकिशन बाजोरीया यांचा पराभव करुन भाजपाने ही जागा बळकावली आहे. मागील भाजपाशी युती तोडल्यानंतर ही विधान परिषदेतील विदर्भातील पहिली निवडणुक असून शिवसेनेला याचा फटका बसल्याचे दिसत आहे.
अकोला विधान परिषदेत बुलढाणा जिल्हयात सर्वात जास्त मतदान असून 367 पैकी 359 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 367 पैकी 115 मतदान हे भाजपाचे स्पष्ट मतदार आहेत असे असतांनाही बुलढाणा जिल्हयात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या नियोजनामुळे भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना 200 च्यावर मतदान मिळल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे अकोला विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात बुलढाणा ‍ जिल्हयाचा सिहाचा वाटा असून भाजपा ‍जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांचे नियोजनाचे कौतुक केल्या जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here