Home Breaking News अकोल्यात भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी अशी मारली बाजी!

अकोल्यात भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी अशी मारली बाजी!

 

खामगाव: अकोला-बुलढाणा-वाशीम विधानपरिषद मतदार संघातून नुकताच मतमोजणीचा निकाल हाती आला असून सुज्ञ मतदारांनी आपल्या पहिल्या पसंतीचे मत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या पारड्यात टाकले आहे.

त्यांचा मोठ्या फरकाने विजय झाला असून या मतदारसंघात गेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना यावेळेस पराभूत व्हावे लागले. शिवसेनेकडून महा विकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करून भाजपाचे वसंत खंडेलवाल विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाल्याचे समजतात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठिकाणी जल्लोष साजरा केला.

अशी आहेत मते

वसंत खंडेलवाल
भारतीय जनता पक्ष, मते- 443

गोपीकिशन बाजोरिया
महाविकास आघाडी, मते – 334

 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत.

 

जिल्हा प्रशासनाकडून मतदारांची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आलेली असून एकूण 821 मतदार आहेत यात 389 पुरुष आणि 432 महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक 368 मतदार हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. अकोल्यात 285 तर वाशिम जिल्ह्यात एकूण 168 मतदार आहेत. या पैकी 808 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये बाजोरिया यांना 334 खंडेलवाल यांना 443 मध्य मिळाली आहेत.

 

बोली लावण्यात सरशी
विधानपरिषद निवडणुकीत विजय झालेले भाजपाचे वसंत खंडेलवाल हे बोली लावण्यात सरस ठरल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सभापती अशा मतदारांनी लक्ष्मी दर्शनानंतर आपल्या पहिल्या पसंतीचे मत खंडेलवाल यांच्या पदरात टाकले आहे. दोन्हीकडून वाटप झाले असले तरी खंडेलवाल यांची बोली सरशी असावी असे यावरून दिसून येते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here