Home निवड - नियुक्ती राष्ट्रीय चर्मकार संघाच्या विदर्भ प्रवक्तापदी विठ्ठल निंबोळकार

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या विदर्भ प्रवक्तापदी विठ्ठल निंबोळकार

संग्रामपूर :  टुनकी येथील रहिवासी पत्रकार विठ्ठल गजानन निंबोळकार यांची राष्ट्रीय चर्मकार संघाच्या विदर्भ प्रवक्ता प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुरावजी माने यांच्या निर्देशावरून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामभाऊ कदम यांनी 13 डिसेंबर रोजी एका पत्रान्वये केली आहे. विठ्ठल निंबोळकार यांनी सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतल्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून समाजबांधवांना एकत्रित करून त्यांचा संघटनेत सहभाग करावा, तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्तीचे समाजबांधवांकडून स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here