Home Breaking News राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कारकीर्दीत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ; शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष...

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कारकीर्दीत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ; शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा आरोप

अकोला : गेली दोन वर्षापासून महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे जेव्हा पासून हे सरकार स्थापन झाले तेव्हा पासून महाराष्ट्र राज्यात विकास कामांना ब्रेक लागला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी नोकर भरती नाही आणि नोकर भरती काढण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसले इकडून तिकडून सरकारी नोकर भरती काढली तर त्या मध्ये ज्या कंपनीला टेंडर दिले त्या सर्व भ्रष्ट निघाल्या किती तरी वेळा परीक्षा रद्द करण्याची वेळ आली हे व विद्यार्थांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे सर्व घोटाळेच घोटाळे
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!
पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत
आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!
भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!
दोषींवर कठोर कारवाई करावी तरी पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार आहे की नाही या लाखो विद्यार्थी आता सरकारी नोकर भरती निघेल म्हणून एक आशा घेऊन रात्रंदिवस मेहनत करीत आहे त्यांना न्याय मिळेल की नाही लवकरात लवकर अश्या भरती प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्या तर ठीक नाहीतर शिवसंग्राम संघटना अख्या महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतल्या शिवाय राहणार नाही .
असा इशारा सुद्धा संदीप पाटील यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here