Home Breaking News शिवांगी बेकर्स कंपनी मध्ये कामगारांचे मनसेच्या नेतृत्वात विविध मागण्याकरीता काम बंद आंदोलन...

शिवांगी बेकर्स कंपनी मध्ये कामगारांचे मनसेच्या नेतृत्वात विविध मागण्याकरीता काम बंद आंदोलन सुरू

 

मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलिंग व्दारे साधला कामगारांशी संवाद

मनसे उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांची आंदोलनाला भेट

खामगाव : शिवांगी बेकर्स कंपनी मधील कामगारांवर कंपनी संचालकांकडून अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू आहे तो अन्याय दुर व्हावा आनी कामगारांना त्यांचा हक्क मिळावा या करीता कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्विकारले आहे.

त्यानुसार कंपनी संचालकांशी वेळो वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी संवाद साधत कामगारांवर अन्याय करु नका त्यांना त्यांचा हक्क द्या फक्त संवादच नाही तर संबंधित संचालका बरोबर लेखी पत्रव्यवहार केला परंतु सर्व प्रयत्न फेल ठरले मनसेचे सभासद स्विकारलेल्या कामगारांना कंपनीने त्रास देने सुरू ठेवले म्हणून आज पासून कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात कंपनी काम बंद आंदोलनाची हाक दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते निलेश पाटील ,अक्षय पनवेलकर मुंबई येथून आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण व कामगारांचा संवाद व्हिडीओ कॉलिंग करून दिला.

यावेळी मनसेचे उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडकार , वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा लगर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील शहराध्यक्ष आनंद गायगोळ,शहर उपाध्यक्ष आकाश पाटील अभिजित महानकर यांनी कामगारांची चर्चा केली व आंदोलनात सहभागी झाले यावेळी कंपनीचे कामगार गोपाल चरखे, दिलीप गिठ्ठे, राम शिंदे,विशाल घोगले, मनोज लांडगे, प्रशांत सुरोशे, निलेश श्रीनाथ, गजानन घ्यार, भागवत ठाकरे, नितीन कोळसे, भरत वरघट, दीपक मोडकर, आकाश कोल्हे , राहुल येडे, दीपक वानखडे, प्रविण तायडे विलास वरघट, विजय मांडवेकर हे आंदोलनाकरीता परिश्रम घेत आहेत आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांची उपस्थित दिसुन आली आज दिवसभरात एकही कामगार कंपनीमध्ये गेला नसल्याने कंपनी आज दिवसभर बंद होती हे विशेष

मनसे कामगार सेनेचे सभासद स्विकारलेल्या शिवांगी बेकर्स कंपनीच्या कामगारांच्या प्रमुख मागण्या

१) २६ दिवसांचा कामाचा करारनामा करण्यात यावा, नियमानुसार कंपनीने किमान वेतन नुसार वेतन द्यावे

२)सर्व कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळालीच पाहिजे

३)ओव्हरटाईम चा मोबदला नियमानुसार मिळालाच पाहिजे

४)पगारावर पुर्ण बोनस मिळालाच पाहिजे

५)कामगारांना बेकायदेशीर नोटीसा देने बंद झाल्याच पाहिजे

६)सर्व कामगारांची पगार वाढ झालीच पाहिजे

७)बेकायदेशीर गेट पास बंद झाल्याच पाहिजे

८)कंपनी संचालकाकडुन कामगारांना देण्यात येणारा त्रास बंद झालाच पाहिजे

९)कामगारांचे कामाचे डिपार्टमेंट (विभाग) बदलवने थांबलेच पाहिजे अश्या विविध मागण्याकरीता आजपासून आंदोलन सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here