Home दुःखद बातमी रस्ता ओलांडतानाच काळाने गाठले! तरुणाचा मृत्यू!!

रस्ता ओलांडतानाच काळाने गाठले! तरुणाचा मृत्यू!!

 

खामगाव –  रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाची धडक लागून जखमी झालेल्या दोन तरुणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे ही दुःखद घटना खामगाव शेगाव रस्त्यावर लासुरा फाट्यानजीक बुधवारी रात्री घडली. रस्ता ओलांडताना तरुणाला काळाने गाठले असून या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

अशी घडली घटना;  पोलीसात गुन्हा दाखल

शेगाव- खामगाव मार्गावर लासुरा फाट्याजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आठ डिसेंबरच्या रात्री सव्वानऊ वाजेदरम्यान घडली तर नऊ डिसेंबर च्या पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव खामगाव मार्गावरील लासुरा फाटा येथे नादुरुस्त झालेले टाटा ४०७ वाहन क्रमांक ३०,एबी २११४ ज्याच्या दुरुस्तीचे काम रस्त्याच्या कडेला सुरू होते. या वाहनासोबत असलेले सुरज महादेव तायडे रा. शिरसगाव नीळे, निखिल वाकोडे हे दोघे लघवी करण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पांढऱ्या रंगाच्या सीटर गाडी क्रमांक एम एच १४, ही डब्ल्यू २१९५ या वाहन चालकाने त्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून सुरज तायडे निखील वाकोडे यांना जोरदार धडक मारली या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सुरज महादेव तायडे यास मृत घोषित केले. याबाबत भास्कर मनोहर निखारे वय ३६ वर्षे राहणार शिरजगाव निळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन क्रमांक एम एच १४ सी डब्ल्यू २१९५ चालकाविरुद्ध कलम ३०४ अ ३३८, २७९, भादवि सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेव ठाकरे करीत हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here