Home बुलडाणा जिल्हा वृत्त तेजेंद्रसिंह चौहान यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही महत्त्वाची निवदनाद्वारे मागणी

तेजेंद्रसिंह चौहान यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही महत्त्वाची निवदनाद्वारे मागणी

खामगाव : शैक्षणिक सत्र 2021-2022 मध्ये प्रवेश घेणार्‍या ओबीसी, एस.सी., एस.टी., व्हीजेएनटी मधील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेमध्ये प्रवेश घेण्यासकारिता 7/12/2021 ही अंतिम तारीख केंद्रीय प्रवेश मंडळाकडून देण्यात आलेली आहे. त्यांनातर त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल असे केंद्रीय प्रवेश मंडळाने सांगितले आहे. त्यामुळे हजारो मागासवर्गीय विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखेमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ करून द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळेल.
कोरोना मुळे शासकीय कार्यालये काही काळ बंद होती, तर त्यांनतर 50% उपस्थिती मध्ये सुरू होती. त्यामुळे प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यास खूप अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे वेळेमध्ये जात वैधता पडताळणी समितीसमोर अर्ज सादर करण्यास विद्यार्थी व त्यांच्या पालकांना उशीर झाला. अजूनही बर्‍याच विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाहीत. जातवैधता प्रमाणपत्रामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याकरिता मुदत वाढ करून द्यावी अशी मागणी तेजेंद्रसिंह चौहान यांनी मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. सोबतच महाराष्ट्र प्रदेश कोंग्रेस कमेटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले, मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत, मा.समाज कल्याण मंत्री धनंजयजी मुंढे यांना सुद्धा सदर निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here