Home Breaking News ईगल इन्फ्रा कंपनीला काळया यादीत टाकण्यासाठी हालचाली; संदीप पाटील यांचा पुढाकार!

ईगल इन्फ्रा कंपनीला काळया यादीत टाकण्यासाठी हालचाली; संदीप पाटील यांचा पुढाकार!

 

संदीप पाटील यांनी केलं विनायकराव मेटे यांना निवेदन सादर

अकोला- येथून जवळच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अकोला ते बाळापूर (जि.अकोला) दरम्यान रिधोरा येथे ईगल येथे इन्फ्रा कंपनीने डांबर निर्मितीचा प्लांट सुरू केलेला आहे, सदर कंपनीमध्ये मजूर व कामगारांच्या सुरक्षे बाबत कोणतीही उपाययोजना नसल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विधिमंडळ अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सदर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली. त्यासाठी त्यांनी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांना निवेदन सादर केले.


ईगल इन्फ्रा कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जी व बेजबाबदारपणामुळे दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. मजूर व कामगारांच्या सुरक्षेअभावी सदर दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने ईगल इन्फ्रा कंपनीवर जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल झाला. परंतु गुन्हेगार अधिकाऱ्यांना पकडण्यात आलेले अपयश आणि भविष्यामध्ये अशा गंभीर घटना घडू नये याकरीता शासनाने सदर गंभीर घटनेची दखल घेण्याची आवश्यकता आहे. सदर कंपनीवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासोबतच ईगल इन्फ्रा कंपनीला काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे. याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी स्थानिक मजूर व कामगार यांच्यामध्ये निर्माण झालेला तीव्र असंतोष पाहता ईगल इन्फ्रा कंपनीवर काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत शासनाने तातडीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. अशी मागणी संदीप पाटील यांनी आपल्या निवेदनामध्ये केलेली आहे. या निवेदनाच्या प्रतीलिपी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here