Home Breaking News तो वाघ हाच आहे का? काय आहे नेमका प्रकार?

तो वाघ हाच आहे का? काय आहे नेमका प्रकार?

खामगाव, : शहरातील सुटाळपुरा भागात ४ डिसेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास वाघ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ३३ सेकंदांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाघ दोन वेळा फिरताना दिसत आहे. दरम्यान, दुपारच्या वेळी एका शेतात वाघ दिसल्याची माहिती समजल्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम त्याला शोधण्यासाठी दाखल झाली आहे.
अद्याप वनविभागाला वाघ आढळून आला नाही. लोक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्रीचा अंधार असल्याने सर्च ऑपरेशनमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे.
दरम्यान, डीपी रोड, रायगड कॉलनी व परिसरातील नागरिकांनी शांतता राखत खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे. सुटाळपुऱ्यामधील राजपूत यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ४ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजून २७ मिनिटांनी ३३ सेकंदांच्या दरम्यान वाघसदृश प्राणी दिसून आला. भागीरथीबाई उमाळे यांनी वाघ दिसल्याचे सकाळी सांगितल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, अस्पष्ट दिसत असल्याने हा वाघच आहे, याबाबत निश्चित सांगता येत नव्हते. हे फुटेज सर्वत्र व्हायरल झाल्याने भीती वाढली. दरम्यान, दुपारच्या वेळी याच परिसरातील बुंदेले यांच्या शेतात वाघ आढळल्याची बातमी पसरली. त्यामुळे वनविभागाची रेस्क्यू टीम पोहोचली. शेतशिवारातील पिके, झाडीझुडुपे आणि अंधार यामुळे वाघाचे रेस्क्यू करण्यात अडथळे येत आहेत.

हा तोच का वाघ?

टिपेश्वर अभयारण्यातून सी 1 हा वाघ मागील वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करत बुलडाणा मधील ज्ञानगंगा अभयारण्यात आला आणि जवळपास नऊ महिन्यापासून याच अभयारण्यात स्थिरावला होता,
जवळपास अडीच हजार किलोमीटर चा प्रवास करत सी 1 वाघ हा ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे.

एका वाघाला राहण्यासाठी स्क्वेअर किलोमीटर जागा, अन्न साखळीतील प्राणी लागतात त्यानुसार ज्ञानगंगा अभयारण्यात याच पद्धतीने पोषक वातावरण असल्याने ही एक जमेची बाजू आहे. हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात दिसला होता. सी 1 वाघाल मिळाली इकडे रमला आहे आहे का? हे लवकर कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here