Home बुलडाणा जिल्हा वृत्त नगर पंचायत निवडणुकीसाठी गजानन लोखंडकार ‘प्रहार’चे निरीक्षक

नगर पंचायत निवडणुकीसाठी गजानन लोखंडकार ‘प्रहार’चे निरीक्षक

बुलडाणा,दि.४ (प्रतिनिधी)
……………………………..
संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘प्रहार’ जनशक्ती पक्षात गेल्या १५ वर्षांपासून सक्रीयपणे कार्यरत असलेले गजानन लोखंडकार यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ना. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘प्रहार’ गेल्या २० वषांपासून जनसेवेत कार्यरत आहे. दिव्यांग, विधवा, निराधार, गरजुंना न्याय मिळवून देण्याचे काम ‘प्रहार’ करीत आहे. दरम्यान समाजकारणासोबतच राजकारणात देखील ‘प्रहार’ आता सक्रीय झाली असून संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतीच्या निवडुकीत प्रहार जनशक्ती पक्षही मोठ्या ताकदीने उतरला आहे. त्याच अनुषंगाने २ डिसेंबर रोजी पक्षाचे राज्य सचिव गणेश पुरोहीत, सहसचिव रविंद्र सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूर येथे पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गजानन लोखंडकार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू कडू, कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या आदेशान्वये सदरची नियुक्ती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here