Home Breaking News माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली ‘पोलखोल’; खामगावकरांना पाणी देण्यासाठी नगर पालीका...

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली ‘पोलखोल’; खामगावकरांना पाणी देण्यासाठी नगर पालीका सफशेल ‘फेल’!

खामगावः- वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे कारण पुढे करुन खामगांव नगर पालीकेच्या वतीने शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर टाकला जात आहे. 10 ते 12 दिवस पाणी न देता नागरीकांना वेठीस धरणे चुकीचे असुन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नगर पालीका प्रशासनाने आणखी वेळ न दवडता उपाययोजना करणे गरजेचे आहे. रोहणा उपकेंद्रावरील वीज पुरवठा नेहमीच सुरळीत असल्याने पालीकेने खोटारडेपणाचे तुनतुणे वाजविणे बंद करावे असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला आहे.
गेरु माटरगांव येथील ज्ञानगंगा प्रकल्पात मुबलक जलसाठा असतांनाही गेल्या 12 दिवसापासून खामगांव शहराला पाणी पुरवठा झालेला नाही. यामुळे खामगांव षहर वासीयांना पाण्यासाठीवणवण भटकावे लागत आहे.याबाबतची परिस्थिती जाणुन घेण्यासाठी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दि.03 डिसेंबर 2021 रोजी रोहणा येथील महाराश्ट राज्य विद्युत वितरण उपकेंद्राला भेट दिली.

वीज उपकेंद्राची पाहणी करताना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा 

यावेळी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रोहणा वीज उपकेंद्राच्या अधिकारी यांना धारेवर धरले त्यावेळी धरणावरील विज पुरवठा नियमित सुरळीत असल्याचा खुलासा रोहणा उपकेंद्राचे सहायक अभियंता रविंद्र जुमळे यांच्याकडून देण्यात आला. यावेळी रविंद्र जुमळे म्हणाले की,पाणी पुरवठयाकरीता आमच्या रोहणा सबस्टेशन वरुन सुरळीत विद्युत पुरवठा होत आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याबदद्ल खामगांव नगर परिषदेकडुन आम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. रोहणा येथील फिडरवरुन व्यवस्थीत विद्युत पुरवठा सुरु असुन पाणी पुरवठा सुध्दा व्यवस्थीत चालु आहे असेही जुमळे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा रोहणा सबस्टेशनवर जावुन ऑपरेटर गणेश मानखेर व टेक्निशीयन सागर खोडके यांच्याकडून संबंधीत ट्रान्सफार्मर फिडरची माहिती जाणुन घेतली. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबरावदादा देशमुख,माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर उपस्थित होते.
पालीकेकडुन शहरवासीयांची दिशाभूल
खामगांव शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले असतांना जुनी कार्यान्वित असलेली योजनेलाही नगर पालीका प्रशासनाच्या वतीने या ना त्या कारणाने बदनाम केले जात आहे. वीज पुरवठा सुरळीत असतांनाही गत 12 दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी या प्रकराकडे स्वतः लक्ष देवुन पाणी पुरवठयाचे दिवस कमी करण्यासाठी तसेच पाणी पुरवठा योजनेतील त्रुटया दुर करण्यासाठी प्रयत्न करावे. वाढीव पाणी पुरवठा योजनेचे गत पाच वर्शापासून रखडलेले 5 टक्के कामकाज सुरळीत करुन जनतेची दिशाभूल थांबवावी असेही मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here