Home निवड - नियुक्ती लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या चिखली तालुका अध्यक्ष पदी संदीप सावळे

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या चिखली तालुका अध्यक्ष पदी संदीप सावळे

 

चिखली/प्रतिनिधी

लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या चिखली तालुका अध्यक्ष पदी संदीप सावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले यांनी हे नियुक्ती पत्र दिले असून चिखली तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या समस्या वर आवाज उठविण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यातील खेड्यापाड्यातील काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक अटचणीचा सामना करावा लागतो, त्याला वेळप्रसंगी अपमान देखील सहन करावा लागतो त्यामुळे त्यांच्या अटचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी भक्कपपणे उभे राहण्याचे काम लोकशाही पत्रकार संघ करणार आहे. अश्या पत्रकारांनी देखील लोकशाही पत्रकार संघात सहभागी झाले पाहिजे असे आव्हान यावेळी पत्रकार संघाचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष संदीप सावळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here