Home एस टी कर्मचारी आंदोलन ६ डिसेंबर रोजी समाजबांधवानी व नागरिकांनी चैत्यभूमी मुंबई येथे जावू नये- अशोक...

६ डिसेंबर रोजी समाजबांधवानी व नागरिकांनी चैत्यभूमी मुंबई येथे जावू नये- अशोक सोनोने

खामगांव ( प्रतिनिधी )- ६ डिसेंबर रोजी महामानव डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमी मुंबई येथे जावू नये घरुनच डाॕ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे असे आवाहन श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पार्लमेटरी बोर्ड सदस्य माननीय अशोकभाऊ सोनोने यांनी केले आहे.
याबाबत ते पत्रकारांशी बोलताना , पुढे म्हणाले की , सध्या रेल्वे पुर्णपणे चालू झालेली नाही. एसटी चा संप सुरु आहे सोबतच कोरोनाच्या नव्या ओमीक्रोम विषाणू बद्दल शंका आहे. तेव्हा अशा परिस्थितीत आपण चैत्यभूमी मुंबईला जाणे टाळावे घरुनच महामानवांना अभिवादन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष धुरंधर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here