Home दुःखद बातमी रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी युवकाचा मृत्यू

रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी युवकाचा मृत्यू

 

बुलडाणा : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे’ नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या बाईकस्वार युवकाचा अखेर मृत्यू झाला. बुलडाण्यात झालेल्या अपघातातील जखमी तरुणावर औरंगाबाद येथे उपचार सुरु होते. या उपचारा दरम्यान युवकाचा मृत्यू झाला आहे.अपघातात रविकांत तुपकर यांना कुठलीही गंभीर दुखापत झाली नव्हती.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रविकांत तुपकर यांची इनोव्हा गाडी आणि मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला होता. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान, दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी तुपकरांच्या गाडीला येऊन धडकली. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील दोघे जण जखमी झाले होते.
दोघेही येवता येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातात रविकांत तुपकर यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. पण तुपकर आणि त्यांचा ड्रायव्हर यांना दुखापत झाली नव्हती.
यावेळी रविकांत तुपकर यांनी स्वतः धावाधाव करत जखमींना औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. मात्र उपचार सुरु असताना यातील जखमी तरुणाची प्राणज्योत मालवली. तुषार परिहार असे मृत्युमुखी पडलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव आहे. तर दुसरा जखमी गजानन सोळंकी हा उपचार घेऊन घरी परतला. मुंबई येथे सोयाबीन- कापुसप्रश्नी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आयोजित असलेल्या बैठकीला जात असताना रविकांत तुपकरांच्या गाडीला 22 नोव्हेंबरच्या रात्री हा अपघात झाला होता. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी आणि तुपकर यांची इनोव्हा कार समोरासमोर धडकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here